-
कर्जत आणि जामखेडने स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेतला आहे. त्यासाठी स्थानिक नागरिक, पदाधिकारी, प्रशासन यांच्या सोबतीला स्थानिक आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार देखील या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. रोहित यांनीच ट्विटर आणि फेसबुकवरुन आपल्या आईचे काही फोटो शेअर करत, 'थोर तुझे उपकार आई!' असं म्हटलं आहे.
-
आमदार रोहित दादा पवार सध्या मतदारसंघाच्या विकासासाठी करत असलेल्या प्रयत्नांना उभारी देण्यासाठी बारामती ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त आणि रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार देखील अनेक उपक्रमातून रोहित पवारांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्यातुन विविध व्यवसाय व महिलांच्या प्रश्नांसाठी झटत आहेत. (फोटो: Facebook/OfficeofRohitPawar वरुन साभार)
-
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कर्जत जामखेड मतदारसंघाचे नाव उंचावण्यासाठी सुनंदा पवार स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाल्या असून जातीने या दोन्ही शहरातील नागरिकांच्या वॉर्ड निहाय बैठका घेवून संवाद साधून स्वच्छते संदर्भात जागृती करत आहेत. (फोटो: Facebook/OfficeofRohitPawar वरुन साभार)
-
केवळ जागृतीच नाही तर सुनंदा पवार स्वतः हातात खोरे-टिकाव घेवून अधिकाऱ्यांसोबत श्रमदान करताना दिसत आहेत. (फोटो: Facebook/OfficeofRohitPawar वरुन साभार)
-
सुनंदा पवार यांच्या सोबत राजकीय पदाधिकारी,शासकीय अधिकारी,नगरपंचायत,रोटरी क्लब,हरित अभियान, बीजेएस,आजी माजी सैनिक संघटना,एन.एस.एस, एन.सी.सी,पत्रकार संघटना,सामाजिक संघटना,विद्यार्थी,ग्रामस्थ या स्वच्छ सर्वेक्षण चळवळीत झोकून देऊन काम करत आहेत. (फोटो: Facebook/OfficeofRohitPawar वरुन साभार)
-
रोहित पवार यांनी आमदारकीची शपथ घेताना आपल्या आईने नाव आवर्जून घेतले होते. त्यावेळीही या मायलेकांमधील नात्याबद्दल सोशल मीडियावर भरभरुन बोललं गेलं होतं. (फोटो: Facebook/OfficeofRohitPawar वरुन साभार)

७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?