-
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रात गोल्डमॅन म्हणून परिचित असलेल्या सनी वाघचौरेवर पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ तसेच गर्भपात केल्या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (सर्व फोटो सौजन्य – सनी वाघचौरे फेसबुक)
-
सनीला अंगावर सोन घालायची आवड आहे. तो फक्त अंगावरच सोन घालत नाही, तर त्याचे बूट आणि मोबाइलही सोन्याचा आहे. त्याने त्याच्या कारलाही सोन्याचा मुलामा दिला आहे.
-
सनी वाघचौरे हा कॉमेडियन कपिल शर्माचा मित्र असून त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्जज कलाकारांसोबत गोल्डमॅन सनीची ओळख असून त्यांच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.
-
सनी बऱ्याचदा बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत दिसतो. अभिनेता विवेक ओबेरॉय सोबतही त्याची चांगली ओळख असल्याचे म्हटले जाते.
-
सनीच्या गळयात सोन्याच्या चैनी असतात. हातात गोल्डचे कडे, ब्रेसलेट आणि सोन्याचे घडयाळ असते.
-
एवढेच नाही, तर सनीकडे सोन्याचा मुलामा दिलेली ऑडी कारही आहे. सनीचे बूटही सोन्याचे असून त्याचा आयफोन गोल्ड प्लेटेड आहे.
-
अंगावर एवढे सोने असल्यामुळे सनीसोबत नेहमी अंगरक्षकही असतात. सोशल मीडियावर त्याचे फोटो मोठया प्रमाणावर आहेत.
-
पीडित पत्नीने तक्रारीमध्ये सनीवर बाहेरील स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवल्याचा तसेच मारहाण आणि शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?