-
आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांची पत्नी लवकरच सीमेवर युद्ध लढण्यासाठी जाणार आहे. (सर्व फोटो सौजन्य – अन्ना हाकोब्यान इन्स्टाग्राम)
-
निकोल पाशिनयान यांची पत्नी अन्ना हाकोब्यान यांनी त्यासाठी लष्करी प्रशिक्षण सुरु केले आहे. त्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
-
नागोर्नो-काराबाख भागामध्ये आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये भीषण लढाई सुरु आहे. अन्ना हाकोब्यान लवकरच तिथे जाऊन अजरबैजान विरुद्ध युद्ध लढणार आहेत.
-
१३ सदस्यीय महिला पथकाचे लवकरच लष्करी प्रशिक्षण सुरु होणार आहे, असे ४२ वर्षीय अन्ना हाकोब्यान यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. या १३ सदस्यीय पथकामध्ये त्या सुद्धा आहेत. एएफपीने हे वृत्त दिले आहे.
-
"आमच्या सीमेच्या रक्षणासाठी सैन्य दलाच्या मदतीसाठी लवकरच आम्ही निघू. आमची मातृभूमी आणि आत्मसन्मानाचे आम्ही शत्रूसमोर आत्मसमर्पण करणार नाही" असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
-
आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतरचा त्यांचा हा दुसरा लष्करी प्रशिक्षण कार्यक्रम आहे.
-
मागच्याच महिन्यात हाकोब्यान आणि काराबाखमधील महिलांच्या गटाला लष्करी तळावर सात दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. शस्त्रास्त्र आणि दारुगोळयाचा कसा वापर करायचा, हे त्यांना तिथे शिकवण्यात आले.
-
सप्टेंबरपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु आहे. आतापर्यंत त्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. रशिया आणि अमेरिकेने स्वतंत्रपणे तीन वेळा शस्त्रसंधी घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. या भागात तणाव कायम वाढत आहे.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं