-
भारतात लशीकरणाच्या कार्यक्रमाची कशी तयारी सुरु आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका मुलाखतीत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
-
लस तयार झाल्यानंतर ती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे, एक मोठे आव्हान आहे. कारण लशीची परिणामकारकता टिकवून ठेवण्यासाठी ती ठराविक तापमानात स्टोअर होणे आवश्यक आहे.
-
भारतात लशीच्या वितरणासाठी २८ हजारपेक्षा जास्त शीतगृहांचा वापर करण्यात येईल. त्याशिवाय डिजीटल प्लॅटफॉर्मही उपयोगात आणला जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. (संग्रहित छायाचित्र)
-
“जेव्हा करोनाची लस भारतात येईल तेव्हा ती देशातील प्रत्येक नागरिकाला देण्यात येईल. कोणालाही यापासून वंचित ठेवलं जाणार नाही,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
-
करोनाची लस सर्वांना दिली जाईल. पण सुरुवातीला सर्वात असुरक्षित गट आणि फ्रंटलाइन म्हणजे आघाडीवर राहून लढणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केले जाईल असे मोदी इकोनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
-
लशीचा विकास आणि वितरण व्यवस्थेसाठी राष्ट्रीय तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली आहे असे मोदी म्हणाले. (संग्रहित छायाचित्र)
-
संग्रहीत
-
शेवटच्या माणसापर्यंत करोना लस पोहोचवण्यासाठी २८ हजार शीतगृहाच्या साखळीच्या माध्यमातून करोना लशीचे स्टोअरेज आणि वितरण केले जाईल असे मोदींनी सांगितले. (Photo: Reuters)
-
लशीचे वितरण आणि डोस देण्याची प्रक्रिया पद्धतशीरपणे व्हावी, यासाठी राज्य, जिल्हा आणि स्थानिक पातळीवर खास पथके असतील, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केलेली असेल असे मोदी म्हणाले.
-
सरकारनं सुरूवातीच्या टप्प्यात सर्व देशवासीयांना करोनाची लस उपलब्ध करून देण्यासाठी ५० हजार कोटी रूपयांपर्यंतची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. एका व्यक्तीला करोनाची लस देण्यासाठी जवळपास ३८५ रूपयांपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे.

७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?