-
करोना संकटाचा सामना करणाऱ्या जगभरातील देशांना ऑस्ट्रेलियाने मोठा दिलासा दिला आहे. ऑस्ट्रेलियातील सीएसएल लिमिटेड कंपनीने ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका ने करोनावरील लशीची निर्मिती सुरु केली आहे.
-
ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार सोमवारीपर्यंत कंपनीच्या व्हिक्टोरिया येथील प्लॅण्टमध्ये करोनाच्या तीन कोटी लशी निर्माण करण्यात आल्यात.
-
सिडनीमधील के टू जीबी रेडिओने दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य मंत्री ग्रेग हुंट यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (फोटो सौजन्य: एपी)
-
"ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या करोना लशीचा डोस घेणं हे ऐच्छिक असणार आहे. मात्र आम्ही जास्तीत जास्त लोकांना ही लस घेण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत," असं हुंट म्हणाले आहेत.
-
"आमच्याकडे देशातील लोकसंख्येपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात लशी उपलब्ध आहेत," असा विश्वासही हुंट यांनी व्यक्त केला आहे.
-
मार्च महिन्यापासून सर्व सामान्यांना करोनाची ही लस दिली जाणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
-
सिडनीमधील मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार लशीची निर्मिती करणाऱ्या सीएसएल कंपनीला ही लस बाजारात आणण्यासाठी ५० दिवसांचा वेळ लागेल.
-
ऑस्ट्रेलियामध्ये तयार करण्यात आलेल्या या लशीच्या निर्मिती आणि वितरणासंदर्भात एस्ट्राजेनेका आणि ऑस्ट्रेलिया सरकारमध्ये अनेक करार झाल्याचेही समजते.
-
ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाच्या लशीला अद्याप ऑस्ट्रेलियातील आरोग्य यंत्रणेने अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही.
-
या वर्षाच्या शेवटपर्यंत या लशीची शेवटची आणि तिसरी चाचणी पूर्ण होईल असं सांगितलं जातं आहे.
७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?