-
S-400 एअर डिफेन्स सिस्टिम जलदगतीने सुपूर्द करण्यासंदर्भात भारताने कोणतीही विनंती केल्यास, आम्ही आमच्यापरीने लवकरात लवकर ती सिस्टिम देण्याचा प्रयत्न करु, असे रशियाच्या मुत्सद्दी अधिकाऱ्याने सांगितले.
-
पुढच्यावर्षी २०२१ च्या अखेरीस ही एअर डिफेन्स सिस्टिम भारताकडे सुपूर्द करण्याची योजना आहे. दोन्ही देश केए-२२६ या बहुउद्देशीय हेलिकॉप्टर्सची खरेदीसंदर्भातील करार करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अभियान लक्षात घेऊनच हे करार करण्यात येतील, असे रशियाचे मुत्सद्दी अधिकारी रोमन बाबुशकीन म्हणाले.
-
भारताने रशियाबरोबर ५.४ अब्ज डॉलर्सचा पाच S-400 एअर डिफेन्स सिस्टिम खरेदी करण्याचा करार केला आहे.
-
भारत-चीनमध्ये लडाख सीमेवर असलेल्या तणावामुळे S-400 एअर डिफेन्स सिस्टिम लवकरात लवकर मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे काही संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
-
या सिस्टिमसाठी भारताने मागच्यावर्षी पेमेंटचा एक हप्ता दिला आहे. एस-४०० ही जगातील सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम आहे.
-
शत्रूचे कुठल्याही प्रकारचे हवाई हल्ले निष्प्रभ करण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आहे. युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम भारतासाठी हवाई सुरक्षा कवचाचे काम करेल.
-
शत्रूची शक्तिशाली बॅलेस्टिक मिसाइल, फायटर विमाने हवेतच नष्ट करण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. रशियाने विकसित केलेल्या एस-४०० ट्रायम्फ मिसाइल सिस्टिमला नाटोने एसए-२१ ग्रोलर असे नाव दिले आहे.
-
जमिनीवरुन हवेत मारा करणारी लांब पल्ल्याची ही जगातील सर्वात धोकादायक मिसाइल सिस्टिम आहे. अमेरिकेने विकसित केलेल्या टर्मिनल हाय अॅल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टिमपेक्षा एस-४०० जास्त परिणामकारक आहे.
-
एस-४०० बहुउद्देशीय रडार, स्वयंचलित शोध यंत्रणा, विमान विरोधी क्षेपणास्त्र, लाँचर्स तसेच कमांड कंट्रोल सेंटरने सुसज्ज सिस्टिम आहे.
-
युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम फक्त पाच मिनिटात तैनात करता येईल. तीन वेगवेळया प्रकारची मिसाइल डागण्याची क्षमता एस-४०० मध्ये आहे.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं