-
नितीन नांदगावकर हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचं नाव बदला अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली आणि ते पुन्हा चर्चेत आले. (सर्व फोटो सौजन्य – नितीन नांदगावकर इन्स्टाग्राम)
-
नितीन नांदगावकर हे नाव माहित नाही, असे आज महाराष्ट्रात फार कमी जण सापडतील. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या प्रत्येकाला नितीन नांदगावकर हे नाव माहित आहे. जिथे दादागिरी, अन्याय दिसतो, तिथे नितीन नांदगावकर लगेच पोहोचतात.
-
नितीन नांदगावकर राजकारणात असले तरी, सच्चा, तळमळीने काम करणारा कार्यकर्ता अशीच त्यांची जनमानसात प्रतिमा आहे. लोक त्यांचे प्रश्न, समस्या घेऊन आले की, ते प्रश्न पोटतिडकीने सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे लोकांना ते आपले वाटतात.
-
टॅक्सीच्या मीटरचा झोल असो किंवा रिक्षा वाल्याची दादागिरी स्वत: तिथे जाऊन आपल्या स्टाइलने तो प्रश्न सोडवायचा ही त्यांची खासियत. फेसबुकच्या माध्यमातून ते आपल्या आंदोलनाचे व्हिडीओ सुद्धा पोस्ट करतात व लोकांना जागरुक करण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न असतो.
-
समोरचा बधत नसेल, तर कायदा हातात घेऊन प्रश्न सोडवण्याच्या त्यांच्या स्टाइलमुळे त्यांना पोलिसांकडून तडीपारची नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे.
-
आता शिवसैनिक असलेले नितीन नांदगावकर पूर्वाश्रमीचे मनसैनिक आहेत. ते काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेते नव्हते ते मनसेच्या वाहतूक सेनेचे साधे सरचिटणीस होते. आपल्याला पक्षाने जे पद दिले आहे त्याला त्यांनी पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला.
-
टॅक्सीचे वेगाने पळणारे मीटर, रिक्षावाल्यांचा मुजोरी हे जनसामान्यांच्या रोजच्या जगण्याशी निगडीत असलेले मुद्दे त्यांनी तडीस लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अत्यंत कुशलतेने सोशल मीडिया हाताळत आपले काम जनेतपर्यंत पोहोचवले.
-
मागच्यावर्षी ते लोकसत्ता डॉट कॉमच्या डिजिटल अड्डा कार्यक्रमामध्ये आले होते. त्यावेळी पक्षात होत असलेली घुसमट त्यांनी बोलून दाखवली होती. त्यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हाती शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला.
-
ठाण्याचे दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. विविध सामाजिक विषयांवर आंदोलने करत असताना ते जनता दरबाबरही भरवायचे. नागरीकही त्यांचे प्रश्न, फिर्याद घेऊन जनता दरबारात यायचे.
-
कराची स्वीट्सचं नाव बदला अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनीच नितीन नांदगावकरांच्या भूमिकेला फाटा देत, अशा प्रकारची आता मागणी करण्यात काहीच तथ्य नसल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे आता नितीन नांदगावकर यांची पुढची भूमिका काय असेल, याची उत्सुक्ता आहे.
७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?