आपल्या भारताच्या संसद भवनाची इमारत आतून कशी दिसते हे पाहण्याची उत्सुकता साधारणपणे प्रत्येक भारतीय व्यक्तीची असते. त्यातच आता सध्या संसद भवनाची नवीन इमारत उभारण्यात येत आहे. या इमारतीच्या बांधकामाचे काही फोटो सध्या चर्चेत आले आहेत. (सौजन्य : सर्व फोटो इंडियन एक्स्प्रेस) भारताच्या संसद भवनाच्या नव्या इमारतीचं काम २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे या नव्या इमारतीत जुन्या भवनाच्या तुलनेत प्रशस्त आणि सोयी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. संसद भवनाची नवी इमारत सेट्रल विस्टा उभारण्याचं कंत्राट टाटा समुहाला मिळालं आहे. संसदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीसाठी तब्बल ८६१.९० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडनं ८६१.९० कोटी रुपयांना संसदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीचं कंत्राट मिळवल्याचं सांगण्यात येत. या नव्या भवनात ६ प्रवेश द्वार असून १२० कार्यालयांसाठी जागा ठेवण्यात आली आहे. नव्या संसद भवनात लोकसभा सभागृहात १ हजार २७२ जणांना बसण्याची व्यवस्था केली आहे. तर राज्यसभा सभागृहात ६२९ आसनांची सोय करण्यात आली आहे. संसदेच्या नव्या प्रस्तावित भवनाचा एकूण परिसर ६५ हजार चौरस मीटर इतका आहे. यामध्ये एकूण १६ हजार ९२१ चौरस मीटरच्या बेसमेंटचाही समावेश आहे. नवं संसद भवन दोन मजली असेल. तसंच २०२२ मध्ये भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी याचं काम पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भवनाच्या सुशोभीकरणासाठी राष्ट्रीय पक्षी ‘मोर’ आणि राष्ट्रीय फूल ‘कमळ’ यांच्या प्रतिमा आणि भित्तीचित्रंही तयार करण्यात येणार आहेत. देशाचं राष्ट्रीय झाड ‘वड’ याची अनेक झाडं नव्या इमारतीच्या परिसरात लावण्यात येणार आहेत. -
विस्तीर्ण जागेत उभी राहणार नव्या संसद भवनाची इमारत
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं