-
दिवाळी संपल्यानंतर देशामध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे करोना व्हायरसची दुसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.
-
काही राज्यांनी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्याचा तसेच संचारबंदीसारखे निर्णय घेतले आहेत. करोनाचा फैलाव रोखण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे लस.
-
सध्या सिरम इन्स्टिट्यूच्या कोव्हीशिल्ड या लशींच्या तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहेत. कोव्हीशिल्ड ही मूळची ऑक्सफर्डची लस आहे.
-
करोनाची सद्य स्थिती लक्षात घेता, पुणे स्थित सिरम इन्स्टिट्यू ऑफ इंडियाने विकसित केलेल्या ऑक्सफर्डच्या लशीला इमर्जन्सीमध्ये मान्यता मिळू शकते.
-
निती आयोगाचे सदस्य विनोद पॉल यांनी ही माहिती दिली. ठरल्यानुसार, भारतात करोना लशीच्या चाचण्या झाल्या तर जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये फेज तीनच्या चाचण्या पूर्ण होतील.
-
विनोद पॉल हे लस व्यवस्थापनासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल एक्सपर्ट ग्रुपचे अध्यक्ष आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
-
अस्त्राझेनेकाच्या लशीला यूके सरकारने मान्यता दिली तर भारतात अदर पूनावाला यांची सिरम बनवत असलेल्या ऑक्सफर्डच्या लशीला मान्यता देण्याचा विचार होऊ शकतो असे विनोद पॉल म्हणाले. (Photo: Reuters)
-
"यूकेमध्ये ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाच्या लशीला आपातकालीन मंजुरी मिळाली तर, भारतीय नियामकाला सुद्धा तशी संधी आहे" असे विनोद पॉल म्हणाले.
-
फेज तीनच्या चाचण्या पूर्णहोण्याआधी भारतात इमर्जन्सीमध्ये मान्यता मिळाली तर पुढच्यावर्षी लवकरात लवकर प्राधान्यक्रमानुसार लशीचे डोस दिले जाऊ शकतात.
-
आधी आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, त्यानंतर ६५ वर्षावरील व्यक्ती आणि त्यानंतर ५० ते ६० वयोगट असा लशीचा डोस देण्यासाठी प्राधान्यक्रम असू शकतो.
७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?