-
ब्रिटनमधील एका अभ्यासामध्ये करोनामधून मुक्त झालेल्यासाठी दिलासादायक माहिती समोर आली आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत)
-
एखादी व्यक्ती करोना संसर्गामधून पुर्णपणे बरी झाल्यानंतर पुढील सहा महिने पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता खूपच कमी असते, असं या अभ्यासामधून स्पष्ट झालं आहे.
-
ऑक्सफर्ड विद्यापिठातील तसेच ऑक्सफर्ड विद्यापिठ रुग्णालयाने (ओयूएच) एनएचएस फाउंडेशनच्या मदतीने एक संशोधन केलं.
-
या संशोधनामध्ये पहिल्या फळीमध्ये लढणाऱ्या करोनायोद्ध्यांच्या म्हणजेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या काही चाचण्या घेण्यात आल्या आणि त्याचा अभ्यास करण्यात आला.
-
या अभ्यासामध्ये करोनाचा संसर्ग होऊन बऱ्या झालेल्या व्यक्तींना पुन्हा पुढील सहा महिन्यासाठी करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नसते असं दिसून आलं.
-
संग्रहीत
-
लवकरच या संशोधनाचा अहवाल छापून येणार आहे. या अहवालाचे लेखन करणाऱ्यांपैकी एख असणाऱ्या आयरे यांनी, "या संशोधनामध्ये मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांना सहभागी करु घेण्यात आलं होतं. यामध्ये एकादा संसर्ग होऊन गेल्यानंतर पुढील किमान सहा महिने करोना संसर्गाचा धोका नसतो असं दिसून आलं," असं सांगितलं.
-
(संग्रहित छायाचित्र)
-
यापूर्वीच्या संशोधनामध्ये संसर्ग झाल्यानंतर करोनाविरुद्ध लढा देणाऱ्या अॅण्डीबॉडीज शरीरामध्ये तयार होतात असं दिसून आलं होतं. मात्र या अॅण्डीबॉडीजचे प्रमाण कालांतराने कमी होते. आधी का काळ तीन महिन्यांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र आताच्या संशोधनात हा कालावधी सहा महिन्यांपर्यंत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
-
जगभरामध्ये करोनाबाधितांची संख्या (रविवार, २२ नोव्हेंबर २०२० पर्यंत) पाच कोटी ८० लाखांहून अधिक झाली आहे. जगभरामध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांच्या संख्येने १३ लाख ८० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं