-
सध्या संपूर्ण जगाचे लक्ष करोनावरील लशीकडे लागले आहे. कारण पुन्हा एकदा करोना व्हायरसचे रुग्ण वाढू लागले आहेत.
-
देशाची राजधानी दिल्लीत करोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्र, मुंबईतही करोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे लस एकदा कधी येतेय, याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.
-
कारण करोनामुळे अर्थव्यवस्थेचेही मोठे नुकसान झाले आहे. करोनामुळे लॉकडाऊन करावा लागतो. सर्व काही बंद ठेवावे लागते.
-
आर्थिक व्यवहार ठप्प होत असल्याने जगभरात आतापर्यंत लाखो लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर करोनाची लस उपलब्ध व्हावी आणि यातून सुटका व्हावी अशी नागरिकांची इच्छा आहे.
-
दरम्यान तमाम भारतीयांना दिलासा देणारी एक बातमी आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली करोना प्रतिबंधक लस मोठया प्रमाणात परिणामकारक असल्याचे समोर आले आहे.
-
करोना विरोधात ऑक्सफर्डची लस ७० टक्के प्रभावी असल्याचे ब्रिटीश-स्विडीश औषध उत्पादक अस्त्राझेनेकाने म्हटले आहे. आतापर्यंत करोना प्रतिबंधक लस विकसित करणाऱ्या चार उत्पादकांनी लस कितपत परिणामकारक आहे, त्याचा डाटा सादर केला आहे.
-
मॉर्डना, फायझर या अमेरिकन कंपन्यांच्या करोनावरील लशी ९५ टक्के प्रभावी ठरल्या आहेत. रशियाची स्पुटनिक व्ही लस ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी आहे.
-
भारताप्रमाणेच जगातील अनेक देशांमध्ये ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाची लस उपलब्ध होणार आहे. भारतात ऑक्सफर्डच्या लशीच्या तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु आहेत. वेळ पडलीच तर इमर्जन्सीमध्ये लशीला मान्यताही मिळू शकते.
-
अस्त्राझेनेकाच्या लशीला यूके सरकारने मान्यता दिली तर भारतात अदर पूनावाला यांची सिरम बनवत असलेल्या ऑक्सफर्डच्या लशीला मान्यता देण्याचा विचार होऊ शकतो असे विनोद पॉल म्हणाले.
-
"यूकेमध्ये ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाच्या लशीला आपातकालीन मंजुरी मिळाली तर, भारतीय नियामकाला सुद्धा तशी संधी आहे" असे विनोद पॉल म्हणाले.

New Passport Rules: सरकारने बदलले पासपोर्टचे नियम; आता ‘ही’ कागदपत्रे अनिवार्य, जाणून घ्या बदल