-
संग्रहीत
-
सर्वसामान्यांचे प्राण वाचवण्यासाठी लॉकडाऊनसारखा कठिण निर्णय घ्यावा लागतो. पण त्यामध्ये आर्थिक नुकसानही मोठे होते. त्यामुळे सध्या तरी लस हाच या संकटातून बाहेर निघण्याचा एकमेव मार्ग दिसत आहे.
-
देशाची राजधानी दिल्लीत करोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्र, मुंबईतही करोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे लस एकदा कधी येतेय, याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.
-
संग्रहीत
-
भारताला करोना प्रतिबंधक लशीचा पहिला साठा जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला मिळू शकतो. यामुळे डॉक्टर, नर्सेस आणि महापालिका कर्मचाऱ्यांची लशीकरणाची मोहिम सुरु करता येईल.
-
भारतात सध्या दोन लशी मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यावर आहेत. यात सिरम इन्सिट्यूट उत्पादन करत असलेली ऑक्सफर्डची कोविडशिल्ड लस आहे तर दुसरी भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सीन लस आहे. (Photo: Reuters)
-
सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लशीलाही इमर्जन्सीमध्ये मान्यता मिळू शकते. पण त्यासाठी भारत बायोटेकला फेज एक आणि दोनच्या मानवी चाचणीचा डाटा सादर करावा लागेल. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
-
संग्रहीत
-
कोव्हॅक्सीन प्रमाणे सिरम इन्सिट्यूट उत्पादन करत असलेल्या ऑक्सफर्डच्या लशीलाही इमर्जन्सीमध्ये मान्यता मिळू शकते. या लशीच्याही तिसऱ्या फेजच्या चाचण्या लवकरच पूर्ण होतील. यूकेमध्ये ऑक्सफर्डच्या लशीला मान्यता मिळाल्यानंतर भारतातही तसा विचार होऊ शकतो. भारतात कोविडशिल्ड असे या लशीचे नाव आहे.
-
(संग्रहित छायाचित्र)

Ashish Shelar : “राज ठाकरेंशी वैयक्तिक संबंध होते ते आता संपले…”, आशिष शेलार यांचं वक्तव्य