-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली. त्यावेळी त्यांनी देशातील करोनाच्या सद्य स्थितीबाबत चर्चा केली.
-
देशातील काही भागात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची दखल घेतानाच भारत चांगल्या स्थितीत असल्याचे मोदी बैठकीनंतर म्हणाले.
-
"करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आणि मृत्यूदर याबाबतीत भारत दुसऱ्या देशाच्या तुलनेत चांगल्या स्थितीमध्ये आहे. हे सर्व एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य झाले" असे मोदी या बैठकीत म्हणाले.
-
देशात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जात आहे.
-
लस हाच यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. त्यामुळे लस कधी येणार याकडे सगळयांचे लक्ष लागलेले असताना पंतप्रधान मोदींनी लशीबाबत एक महत्त्वाचे विधान केले.
-
भारत जी कुठली लस आपल्या नागरिकांना देईल, ती वैज्ञानिक दृष्टीने पूर्णपणे सुरक्षित असली पाहिजे. वेगाइतकीच सुरक्षितता सुद्धा महत्त्वाची आहे.
-
राज्यांबरोबर समन्वय साधून लस वितरणाची रणनिती ठरवली जाईल, असे त्यांनी सांगितले. शीतगृह कोल्ड स्टोअरेजसाठी राज्यांनी आतापासूनच काम सुरु करावे, असे मोदींनी सांगितले.
-
लस सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्लान लवकरात लवकर पाठवा, अशी त्यांनी सर्व राज्यांना विनंती केली. लशीचे काम सुरु आहे. पण त्यात जरापण निष्काळजीपणा करु नका, अशी मी आपल्याला विनंती करतो असे मोदी म्हणाले.
-
करोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण पाच टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी आणि मृत्यूदर एक टक्क्यापेक्षा कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले.
-
पंतप्रधानांना करोनावरील लशीच्या वितरणासंदर्भात सूचना केल्या. त्याचबरोबर करोनावरील लस कधीपर्यंत येईल हे आपण ठरवू शकत नाही, अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली.

New Passport Rules: सरकारने बदलले पासपोर्टचे नियम; आता ‘ही’ कागदपत्रे अनिवार्य, जाणून घ्या बदल