-
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सोशल मीडियावर पुन्हा एकदा सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत.
-
यावर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात ट्विटर, यूट्यूब आणि गुगल सर्चच्या ट्रेंडिंग चार्टमध्ये मोदी अव्वल स्थानी राहिले आहेत. ऑनलाइन सेंटिमेंट अॅनॅलिसीस कंपनी चेकब्रँडच्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.
-
सोशल मीडियातील विविध प्लॅटफॉर्मवर 2171 ट्रेंडसह पंतप्रधान मोदी आघाडीवर होते.
-
नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी राहिले, त्यांनी 2137 ट्रेंड मिळवले.
-
पंतप्रधान मोदी आणि जगनमोहन रेड्डी यांच्यानंतर ट्रेंड करणार्या इतर नेत्यांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा समावेश आहे.
-
ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान देशातील प्रमुख 95 नेते आणि सोशल मीडियावरील 500 प्रभावी व्यक्तींचा चेकब्रँडने ऑनलाइन संदर्भात सखोल अभ्यास केला. यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना 70 इतका ब्रँड स्कोअर मिळाला. हा स्कोअर त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी नेत्याच्या तुलनेत दुप्पट आहे. सेंटिमेंट, फॉलोअर, एंगेजमेंट, मेन्स आणि ट्रेंड – या ५ मुद्द्यांच्या आधारावर ब्रँड स्कोअर मोजण्यात आला.
-
यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ब्रँड स्कोअर 36.43 इतका आहे.
-
तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ब्रँड स्कोअर 27.03 एवढा आहे.
-
याशिवाय आसामचे दिवंगत मुख्यमंत्री तरुण गोगोई यांना 31.89 ब्रँड स्कोअर मिळालाय. अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री पेमा खंडू यांनाही 31.89 स्कोअर मिळवला आहे. (फोटो – तरुण गोगोई )
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ब्रँड व्हॅल्यू जवळपास 336 कोटी रुपये आहे. त्यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ब्रँड व्हॅल्यू 335 कोटी रुपये आहे. तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ब्रँड व्हॅल्यू 328 कोटी रुपये आहे. सोशल मीडियावरील फॉलोअर्स आणि एन्गेजमेंटच्या आधारावर ही ब्रँड व्हॅल्यू काढली जाते.
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं