-
ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी यांच्यापेक्षा ब्रिटनमध्ये राहणारी एक भारतीय महिला अधिक श्रीमंत आहे असं तुम्हाला सांगितल्यास खरं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे.
-
ब्रिटनमधील सरकारी तिजोरीच्या देखभालीची जबाबदारी असणारे मुख्य सचिव म्हणजेच ‘ब्रिटन चान्सलर ऑफ द एक्सचेकर’ असणाऱ्या ऋषी सुनाक यांची पत्नी म्हणजेच अक्षता मूर्ती या ब्रिटनच्या राणीपेक्षाही श्रीमंत आहेत. अक्षता या जगभरातील अव्वल आयटी कंपन्यांपैकी एक असणाऱ्या इन्फोसेसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि इन्फोसेस फाउण्डेशनच्या प्रमुख सुधा मूर्ती यांच्या कन्या आहेत.
-
ब्रिटनमधील 'द गार्डीयन' या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ऋषी सुनाक यांनी आपल्या पत्नीकडील संपत्तीचा खुलासा केलेले नाही. त्यामुळेच अक्षता यांची संपत्ती ही ब्रिटनच्या राणीपेक्षाही अधिक असल्याचा दावा करणारा तपास आपण केला असल्याचे 'गार्डीयन'नं म्हटलं आहे.
-
ब्रिटनमधील कायद्याप्रमाणे सर्व मंत्र्यांना त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या नावे असणाऱ्या संपत्तीची खुलासा करावा लागतो.
-
ऋषी सुनाक यांच्यावर देशाच्या आर्थिक कारभाराची जबाबदारी असल्याने त्यांना कायद्यानुसार यासंदर्भात खुलासा करावा लागणार आहे.
-
ऋषी यांच्यावर असणारी जबाबदारी पाहता त्यांनी काही माहिती लपवल्यास तो गुन्हा ठरु शकतो. अर्थमंत्रालयाची महत्वाची जबाबदारी खांद्यावर असतानाच पत्नीची संपत्ती लपवल्यास सरकारी पदाचा खासगी फायद्यासाठी उपयोग करुन घेतल्याचा आरोप त्यांच्यावर केला जाऊ शकतो. ब्रिटनमध्ये मंत्र्यांना त्यांच्या भावंडांची, पालकांची, पत्नीची, सासरवाडीच्या लोकांची आणि इतर जवळच्या नातेवाईकांची संपत्ती किती आहे याचा खुलासा करणं बंधनकारक असतं.
-
ऋषी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची पत्नी अक्षता यांच्या नावे युकेमधील व्हेंचर कॅपीटल फर्म असणाऱ्या कॅटामारेन व्हेंचर्स या कंपनीची मालकी असल्याचे सांगितले आहे.
-
अक्षता मूर्तींच्या नावे असलेले इन्फोसेसचे शेअर्ससंदर्भात खुलासा न करणं हे सरकारी जबाबदारी पार पाडताना खासगी फायद्यासाठी गैरफायदा घेतल्याचं प्रकरण ठरु शकतं. इन्फोसेस कंपनीचा युके सरकारशी करार असल्याने अक्षता यांचे कंपनीत शेअर असल्यास त्यासंदर्भात खुलासा केला जावा असं म्हटलं जात आहे.
-
'गार्डीयन'ने दिलेल्या वृत्तानुसार अक्षता यांच्या नावे युकेमधील किमान सहा कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. यामध्ये अॅमेझॉन इंडियासोबत केलेल्या ९०० मिलियन ब्रिटीश पौंडच्या गुंतवणुकीचाही समावेश आहे.
-
आता यासंदर्भात काय करता येईल याबद्दल ब्रिटीश सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या समितीकडून चाचपणी केली जात आहे. ऋषी यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल काय निर्णय घेता येईल हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल असंही म्हटलं जातं आहे.
-
एकीकडे ऋषी यांच्याबद्दल शंका उपस्थित केली जात असताना दुसरीकडे देशाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मात्र ऋषी यांची पाठराखण केली आहे. ऋषी यांनी आपल्या संपत्तीची सर्व माहिती दिली आहे, असं बोरिस म्हणाले आहेत.
-
ऋषी हे इन्फोसेसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई असण्याबरोबरच लंडनमधील एका गुंतवणुकीसंदर्भात काम करणाऱ्या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. ही कंपनी जगभरातील गुंतवणुकदारांना ब्रिटनमधील उद्योगांमध्ये पैसे गुंतवण्यास मदत करते.
-
अक्षता आणि ऋषी हे स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलमध्ये एकाच वर्गात होते. २००९ साली या दोघांचं लग्न झालं. या दोघांना कृष्णा आणि अनुष्का अशी दोन मुलं आहे.
-
२०१५ साली ऋषी हे रिचमॉन्ड येथून खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २०१७ आणि २०१९ मध्येही त्यांनी विजय मिळवला. फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांना सरकारी तिजोरीचे मुख्य सचिव पदी नियुक्त करण्यात आलं. हे पद ब्रिटनमधील अर्थमंत्र्याच्या दर्जाचे पद आहे.
-
ब्रिटनच्या राणीची खासगी संपत्ती ही ३५० मिलियन ब्रिटीश पौंड म्हणजेच अंदाजे तीन हजार ४०० कोटी इतकी आहे.
-
अक्षता मूर्ती यांची संपत्ती ही ४३० मिलियन ब्रिटीश पौंड इतकी म्हणजे अंदाजे चार हजार २०० कोटी इतकी आहे. वडील नारायण मूर्ती यांच्या इन्फोसेसमध्ये अक्षता यांची हिस्सेदारी असून ही संपत्ती म्हणजे याच हिस्सेदारीचे मुल्यांकन असल्याचे सांगण्यात येते. (सर्व फोटो ट्विटवरुन साभार)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं