-
जगभरातील सुरक्षा यंत्रणांना इंटरपोलने करोना लशीसंदर्भात इशारा दिला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोकं करोनाची बनावट लस बाजारात आणून विकू शकतात असं इंटरपोलने म्हटलं आहे. थेट बाजारपेठेमध्ये किंवा इंटरनेटच्या माध्यमातून करोनाच्या खोट्या लसीची विक्री केली जाऊ शकते असा इशारा इंटरपोलने दिलाय.
-
इंटरपोलने करोना लसीसंदर्भात मागील आठवड्यामध्ये ऑरेंज नोटीस जारी केली आहे. इंटरपोलचे सदस्य असणाऱ्या १९४ देशांसाठी हा इशारा जारी केलाय. करोना लसीसंदर्भातील गुन्ह्यांसाठी सुरक्षा यंत्रणांनी सज्ज राहण्याची गरज असल्याचे इंटरपोलनं म्हटलं आहे.
-
खोटे दावे करुन, चुकीच्या पद्धतीने दावे करुन करोनाची बनावट लस विकली जाईल अशी शक्यता इंटरपोलने व्यक्त केली असून यासंदर्भात जगभरातील सुरक्षा यंत्रणांनी आतापासूनच सावधान होण्याची गरज आहे असं इंटरपोलने नमूद केलं आहे.
-
करोनाच्या लसीसंदर्भात खोट्या जाहीराती करुन त्या विकण्याची तसेच त्यावर खोटे दावे सांगण्याचे गुन्हेगारी प्रकार वाढू शकतात असं इंटरपोलने जारी केलेल्या पत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद केल्याचं पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
-
इंटरपोलने जारी केलेल्या ऑरेंज नोटीसमध्ये करोना लसीसंदर्भात काही कार्यक्रम, व्यक्ती किंवा लस निर्मितीसंदर्भातील खोटे दावे करुन फसवणूक केली जाण्याची शक्यता वर्तवली आहे. अशा फसवणुकीमुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यताही इंटरपोलने व्यक्त केलीय.
-
भारतामध्येही केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय ही केंद्रीय संस्था इंटरपोलशी संपर्कात असते. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सीबीआय भारतामध्ये काहीही उलट सुलट घडू नये यासाठी प्रयत्नशील असते.
-
युनायटेड किंग्डम करोनावरील लसीची अधिकृत घोषणा करत पाश्चिमात्य देशांपैकी करोना लसीला मान्यता देणारा पहिला देश ठरला त्याच दिवशी इंटरपोलने हा इशारा दिला आहे हे विशेष. युनायटेड किंग्डमने लसीला मान्यता देण्याच्या शर्यतीमध्ये युरोपियन युनियनमधील देशांबरोबरच अमेरिकेलाही मागे टाकलं आहे.
-
करोना लसीचा पुरवठा ज्या साखळीच्या माध्यमातून होणार आहे ती पुरवठा साखळी सुरक्षित असेल आणि त्यात कोणतीही गडबड होणार नाही याकडे सुरक्षा यंत्रणांनी विशेष लक्ष द्यावे अशी अपेक्षा इंटरपोलने व्यक्त केली आहे.
-
करोना लसीच्या नावाखाली बनावट लस विकणाऱ्या वेबसाईट्सची ओळख पटवून त्यांच्यावर योग्य वेळी कारवाई करावी असंही इंटरपोलने म्हटलं आहे.
-
"गुन्हेगारी विचारसरणीचे लोक लोकप्रिय व्यक्तींच्या नावाचा वापर करुन खोट्या वेबसाईट्, खोटे दावे करुन बनावट लस विकू पाहतील. अशाने सार्वजनिक आरोग्याला आणि देशातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल," असं इंटरपोलने आपल्या पत्रकात म्हटलं आहे.
-
इंटरपोलचे कार्यकारी सचीव जुर्जेन स्टॉक यांनी हे पत्रक जारी केलं आहे.
-
करोना लसीशीसंदर्भात सर्व प्रकारच्या गुन्ह्यांसाठी सुरक्षा यंत्रणांनी आधीच तयार राहिलं पाहिजे. त्यामुळेच इंटरपोल जगभरातील देशांसाठी हा इशारा जारी करत आहे, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीसंदर्भातही यात इशारा दिलाय.
-
इंटरपोलच्या सायबर क्राइम युनीटने ऑनलाइन माध्यमातून औषध विक्री करणाऱ्या वेबसाईटपैकी तीन हजार अशा वेबसाईट शोधून काढल्यात ज्या बनावट औषधे आणि वैद्यकीय उपकरणे विकतात.
-
फिशींग, स्पॅमिंग, मालवेअर आणि इतर माध्यमातून या वेबसाईट लोकांची माहिती चोरतात आणि त्यांना आर्थिक गंडा घालतात.
-
आरोग्याशी संबंधित गोष्ट असल्याने यामुळे लोकांच्या जिवालाही धोका निर्माण होतो असंही इंटरपोलने म्हटलं आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत.)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं