-
(संग्रहित छायाचित्र)
-
मात्र आता वर्ष संपण्याआधी म्हणजेच ३१ डिसेंबर आधी करदात्यांनी आयकर भरला नाही तर त्यांना १० हजार रुपयांचा भूर्दंड पडू शकतो. वेळेत आयकर न भरणाऱ्यांना १० हजारांपर्यंत दंड होऊ शकतो.
-
वेळेत आयकर भरला नाही तर आयकर विभागाकडून दंड आकारला जातो. त्यामुळेच यंदा वाढून दिलेल्या कालावधीमध्ये म्हणजेच ३१ डिसेंबरच्या आधी आयकर भरला नाही तर करदात्यांना १० हजार रुपये विलंब शुल्क म्हणजेच लेट फीज म्हणून आकारले जातील.
-
त्याचबरोबर पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना विलंब शुल्क म्हणून एक हजार रुपये भरुन मुदत उलटल्यानंतर आयकर भरता येईल.
-
केंद्र सरकारनं १३ मे रोजी आयकर भरण्यासाठी निश्चित केलेली ३१ जुलैपर्यंतची तारीख वाढवून ३० नोव्हेंबर केली होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं (CBDT) त्यावेळी असं म्हटलं होतं की, करोना संकटामुळे करदात्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंतच्या कालावधी वाढवण्यात येत आहे. त्याला पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आली. केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे करोना व लॉकडाउनमुळे आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या करदात्यांना दिलासा देत ही तारीख ३१ डिसेंबर अशी निश्चित केली.
-
सर्व करदात्यांना आयकर परतावा भरणं बंधनकारक असतं. ऑफलाइन, ऑनलाइन आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने आयकर भरता येतो. यापैकी ऑफलाइन पद्धतीने सर्व प्रकारचे आयकर फॉर्म भरता येतात. तसेच ऑनलाइन आयकर परताव्यामध्ये केवळ फॉर्म एक आणि फॉर्म चारच भरता येतो.
-
करदात्यांच्या सोयीसाठी सॉफ्टवेअरच्या मदतीनेही आयकर भरण्याची सोयही आयकर विभागाने उपलब्ध करुन दिली आहे. जावा किंवा एक्सेल फॉरमॅटमध्ये हवा तो फॉर्म डाऊनलोड करुन तो ऑफलाइन पद्धतीने भरता येतो. त्यानंतर एक्सएमएलसाठी नोंदणी करुन ई-फायलिंग पोर्टलवर लॉगइन करुन तो फॉर्म अपलोड करता येतो. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्व प्रकारचे फॉर्म भरता येतात.
-
ऑनलाइन आयकर परतावा दाखल करण्यासाठी ई-फायलिंग पोर्टलवर लॉगइन करुन परताव्याच्या फॉर्म सबमीट करता येतो. मात्र यामध्ये केवळ दोनच प्रकारचे म्हणजेच एक आणि चार क्रमांकाचा फॉर्म भरता येतो.
-
ऑफलाइन पद्धतीने आयकर परतावा भरण्यासाठी आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर म्हणजेच www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जावे. तिथे इनकम टॅक्स रिटर्न सॉफ्टवेअर पर्याय निवडून त्यात डाउनलोड पर्याय निवडावा. त्यानंतर ज्या वर्षाचा आयकर भरायचा आहे ते वर्ष निवडून अॅप्लिकेबल आईटीआर डाउनलोड करावा. त्यानंतर हा फॉर्म ऑफलाइन पद्धतीने भरावा.
-
करदात्यांना फिल्ड एक्सएमएल डाउनलोड करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. यामध्ये बरीचशी माहिती आधीपासूनच लिहिलेली असतो. फिल्ड एक्सएमएल डाउनलोड करण्यासाठी ई-फायलिंग पोर्टलमध्ये लॉगइन करुन माय अकाउंट मेन्यूमध्ये डाउनलोड प्री-फिल्ड एक्सएमएलवर क्लिक करुन एक्सएमएल फाइल डाउनलोड करता येते. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत)
७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?