-
mRNA टेक्निकवर आधारित भारतातील पहिल्या करोना प्रतिबंधक लसीच्या फेज एक आणि दोनच्या मानवी चाचण्यांना ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) परवानगी दिली आहे.
-
जीनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सने HGCO19 ही लस विकसित केली आहे. काही अटींवर ही परवानगी देण्यात आली आहे.
-
पुणे स्थित जीनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स अमेरिकेतील एचडीटी बायोटेक कॉर्पोरेशनसोबत मिळून mRNA टेक्निकवर आधारित लस विकसित करत आहे.
-
(संग्रहित छायाचित्र)
-
फेज १ आणि २ च्या मानवी चाचणीला परवानगी मिळावी, यासाठी कंपनीने पाठवलेल्या प्रस्तावावर समितीने बैठकीत चर्चा केली. एसईसीने विश्लेषण केल्यानंतर डीसीजीआयने क्लिनिकल चाचण्यांना मंजुरी दिली.
-
"सविस्तर चर्चा केल्यानंतर समितीने फेज १ आणि २ च्या चाचण्यांना परवानगी देण्यासाठी शिफारस केली. दुसऱ्या फेजमध्ये जाण्याआधी पहिल्या फेजचा रिपोर्ट सादर करावा लागेल" असे SEC च्या शिफारशींमध्ये म्हटले आहे.
-
जीनोव्हाच्या mRNA लसीसाठी बायोटेक्नोलॉजी खात्याने निधीचा पुरवठा केला.
-
अमेरिकेतील मॉडर्ना आणि पीफायझर या दोन्ही कंपन्यांनी mRNA तंत्रावर आधारी करोना लशीची निर्मिती केली आहे.
-
फायझरच्या लशीला ब्रिटन आणि कॅनडामध्ये मान्यता मिळाली. भारतातही फायझरने आपातकालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.
-
फायझरच्या लशीला अतिथंड तापमानात स्टोअर करावे लागते, तशा पद्धतीच्या सुविधा भारतात मोठया प्रमाणात उपलब्ध नाहीयत. त्यामुळे ही लस लवकर उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.
बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल