-
देशातील ज्येष्ठ राजकीय नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. शरद पवार यांनी आज वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण केले.
-
आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत राजकारणाच्याबरोबरीने कला, क्रीडा असा सर्वच क्षेत्रात शरद पवार यांचा वावर राहिला आहे. त्यामुळे आज वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांना राजकीय तसेच अन्य क्षेत्रातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
-
राजकारणात सर्वच पक्ष आणि त्या पक्षातील नेत्यांसोबत शरद पवार यांचे मित्रत्वाचे संबंध राहिले आहेत. त्यांच्याकडे संकटमोचक म्हणून पाहिले जाते.
-
संकटकाळात पक्षभेद बाजूला ठेवून शरद पवारांनी मदत केलीय. योग्य सल्ला दिला आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही, देशाच्या राजकारणात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. या वयातही त्यांचा काम करण्याचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे.
-
मागच्यावर्षी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन भिन्न विचारधारेच्या पक्षांची मोट बांधून त्यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले.
-
त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरुनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावे लागले. अशा प्रकारे सरकार स्थापन करता येऊ शकते, हे त्यांनी देशाला दाखवून दिले. हे केवळ शरद पवार होते म्हणून शक्य झाले.
-
शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वडिलांसोबत एक सुंदर फोटो पोस्ट करुन, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
. "वयाची आठ दशके पार करत असताना आदरणीय शरद पवार साहेब आजही तेवढेच उत्साही आहेत. त्यांची अविरत काम करण्याची ऊर्जा आम्हा सर्वांना प्रेरणा देऊन जाते. साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा" असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
-
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा शरद पवारांकडून राजकीय धडे घेतल्याचे मान्य करतात.
-
भिन्न राजकीय विचार असले तर शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्ये चांगले मैत्रीचे नाते आहे. आज मोदींनी सुद्धा टि्वट करुन पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
![Sun transit in dhanishta nakshtra](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2024-06-08T201503.979.jpg?w=300&h=200&crop=1)
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा