-
ब्रिटनमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम सुरु झाला आहे. तिथे नागरिकांना करोना प्रतिबंधक फायझर लसीचा डोस दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरपालिकेनेही लसीकरणाच्या कार्यक्रमाची तयारी सुरु केली आहे.
-
भारतात फायझर, सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने आपातकालीन लसीच्या परवान्यासाठी अर्ज केला आहे. सुरक्षितता आणि परिणामकारकता या दोन प्रमुख निकषांवर समाधान झाल्यानंतर भारतातही लवकरच लसीकरणाला मान्यता मिळू शकते.
-
अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या अध्यतेखाली शुक्रवारी महापालिका मुख्यालयात व्हॅक्सीन टास्क फोर्सची पहिली बैठक पार पाडली.
-
लसीकरणासाठी सायन, नायर, केईएम, कूपर तसेच राजावाडी, वांद्रयातील भाभा आणि कांदिवलीतील शताब्दी रुग्णालय निश्चित करण्यात आलं आहे.
-
सर्वातआधी आरोग्य सेवक, त्यानंतर पोलीस कर्मचारी, बँक स्टाफ, बेस्ट कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी या अत्यावश्यक सेवेतील कर्मऱ्यांना करोना प्रतिबंधक लशीचे डोस दिले जातील.
-
तिसऱ्या टप्प्यात ५० वर्षावरील आणि अन्य आजार असलेल्या व्यक्तींना लसीचे डोस दिले जातील.
-
पहिल्या पंधरा दिवसात १ कोटी २५ लाख लोकांना लसीचे डोस देण्याची योजना आहे.
-
तज्ज्ञांच्या मते संख्या यापेक्षा सुद्धा कमी असू शकते. कारण लसीचा डोस दिल्यानंतर शरीरावर होणारे प्रतिकुल परिणाम सुद्धा पहावे लागतील.
-
संग्रहीत
-
लसीचा डोस दिल्यानंतर प्रत्येकाला तीस मिनिट थांबण्यास सांगितले जाईल. रक्तदाब, तापमान आणि हार्ट रेड तपासल्यानंतर घरी सोडण्यात येईल.
-
लसीचा डोस घेण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला ओळखपत्र आधारकार्ड दाखवावे लागेल. मुंबई महापालिका लसीकरणाच्या या मोहिमेसाठी क्यूआर कोडवर सुद्धा काम करतेय.
-
लसीचे तापमान मेन्टेन करण्यासाठी महापालिकेने ३०० कोल्ड स्टोअरेज बॉक्सेस आधीच संपादीत केले आहेत. लस वेळेत आणि वेगात पोहोचवण्यासाठी ट्रान्सपोटेशन सुविधेवर महापालिका काम करत आहे. लस स्टोअरेजची मध्यवर्ती व्यवस्था कांजूरमार्गमध्ये आहे.
-
त्यानंतर अन्य रुग्णालयांमध्ये लसी स्टोअरेजी सुविधा करण्यात येईल. मुंबईला लसीचे डोस कसे पोहोचवणार? ते अजून स्पष्ट झालेले नाही. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट उत्पादन करत असलेल्या कोविशिल्ड लसीला मान्यता मिळाली, तर पुण्याहून येणाऱ्या प्रत्येक गाडीला पोलिसांचे सुरक्षाकवच असेल.
-
प्रत्येक शीतगृहाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त असेल. सध्या जगभरात २६० लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. त्यात आठ लसींची भारतात निर्मिती होईल. त्यात तीन स्वदेशी लसी आहेत.
-
करोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस अखेर दृष्टीपथात आली आहे. आतापर्यंत जगभरात सहाकोटी पेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. पंधरा लाखापेक्षा जास्त नागरिकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत.
बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल