-
महाराष्ट्रामध्ये करोनाचं संकट पुन्हा नव्याने निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीच्या दृष्टीने ठाकरे सरकारने ३१ जानेवारीपर्यंत मिशन बिगीन अगेन लागू राहील असं जाहीर केलं आहे. राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत निर्बंध शिथील केले असले तरी काही गोष्टींना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. यामध्ये मुंबई लोकलचाही समावेश आहे. मुंबई लोकल लवकरच सुरु होईल असं सांगितलं जात असलं तरी अद्याप याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच आता राज्य सरकारने राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सध्या असलेले निर्बंध कायम राहतील असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान या घोषणेनंतर लगेचच पुण्याच्या आयुक्तांनाही पत्रक जारी करत या मिशन बिगीन अगेनबरोबरच ३१ डिसेंबरची नियमावली जारी केली आहे. पुण्याचे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी आज एक आदेश जारी केला आहे. यामध्ये त्यांनी ३१ डिसेंबरची नियमावलीसंदर्भातील दहा मुद्द्यांची माहिती दिली आहे. ३१ डिसेंबर रोजी पुण्यामध्ये कोणत्या गोष्टी कधीपर्यंत सुरु राहतील तसेच नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत करताना काय काळजी घ्यावी यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत. हे याच दहा मुद्द्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
-
१) करोनाच्या अनुषंगाने दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व १ जानेवारी २०२१ रोजी नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घऱाबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरी साधेपणे करावे.
-
२) नागरिकांनी ३१ डिसेंबर दिवशी पुणे महानगरपालिकेच्या श्रेत्रामधील उद्याने, मैदाने, पर्यटनस्थळे तसेच रस्त्यावर अशा सर्वाजनिक ठिकाणी मोठ्या संख्यने गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देऊन आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी.
-
३) करोनाच्या पार्श्वभूमीवर ५० वर्षांवरील नागरिकांनी तसेच १० वर्षाखालील बालकांनी सुरक्षिततेच्या व आरोग्या दृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे.
-
४) कोणत्याही प्रकार गर्दी आकर्षित होईल अशा प्रकारचे धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आय़ोजन करण्यात येवू नये.
-
५) पुणे महानगरपालिका श्रेत्रातील सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्तराँ तसेच बार ३१ डिसेंबर रोजी रात्री पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार आहेत.
-
६) सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्तराँ रात्री पावणे अकराला बंद होतील. त्याचप्रमाणे होम डिलेव्हरीची सुविधाही पावणे अकरापर्यंतच सुरु राहणार आहे. होम डिलेव्हरीची सेवा पावणे अकरानंतर उपलब्ध नसेल.
-
७) नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
-
८) फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येवू नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात यावे.
-
९) यासंदर्भातील आदेश वर मार्गदर्शक सुचना पुढील नवीन आदेश जारी करण्यात येईपर्यंत लागू असतील.
-
१०) करोना प्रतिबंधासाठी पुणे महापालिकेने यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेश आणि सूचना पुढील आदेश मिळेपर्यंत पुणे मनापा क्षेत्रासाठी लागू असतील. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. फोटो सौजन्य: पीटीआय आणि रॉयटर्स)
बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल