-
ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून राज्यात २२ डिसेंबरपासून ५ जानेवारीपर्यंत मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. (सर्व फोटो – संग्रहित)
-
नाईट कर्फ्यू आज संपत असून तो पुन्हा नव्याने लागू केला जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.
-
ब्रिटनमध्ये करोनाचा नवा प्रकार आढळला असून भारतातही हा संसर्ग पोहोचला आहे.
-
संग्रहित
-
राजेश टोपे यांनी यावेळी जनतेने जागरुक राहावं, घाबरण्याचं कारण नाही. चिंता करु नका पण काळजी घ्या असं आवाहन केलं.
-
"व्हायरसचा हा नवा प्रकार जास्त संसर्गजन्य आहे. ७० टक्के अधिक झपाट्याने संसर्ग होऊ शकतो. काळजी घ्यावी, सजग राहावं इतकंच महत्वाचं आहे," असं त्यांनी सांगितलं.
-
करोनाच्या नव्या प्रकारामुळे राज्यात पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे रात्री ११ ते सकाळी ६ असा सात तासांसाठी कर्फ्यू लागणार का ? अशी विचारणा यावेळी राजेश टोपेंना करण्यात आली.
-
यावेळी त्यांनी मुंबई लोकल, नाईट कर्फ्यू यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील अशी माहिती दिली.
-
(संग्रहीत छायाचित्र)
-
राजेश टोपे यांनी यावेळी ८ जानेवारीला सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचं ड्राय रन होणार असल्याची माहिती दिली. "७ जानेवारीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत आमची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग होणार असून अनेक मुद्दे मांडणार आहेत. ज्या त्रुटी वाटत आहेत त्याबद्दल देखील सांगणार आहोत. ८ तारखेला प्रत्येक जिल्ह्यात ड्राय रन करणार असून त्याच्यातून आपली यंत्रणा तपासली जाईल. यामध्ये काही त्रुटी वैगेरे आहेत का? पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यात समन्वय आहे का? याचीही पाहणी होईल. ज्यावेळी आपण लसीकरणाचा कार्यक्रम राबवू त्यावेळी कोणतीही अडचण न येता कार्यक्रम राबवता यावा यादृष्टीने हे सर्व करणार आहोत," अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
-
नाइट कर्फ्यू दरम्यान ११ ते ६ या वेळात पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असते. तसंच रात्री ११ नंतर अनावश्यक प्रवास करता येत नाही.

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल