-
पूर्व लडाख सीमेवर भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आहे. लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवरील अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतरही दोन्ही देशांमधील सीमावाद अद्यापी मिटलेला नाही.
-
मागच्यावर्षी एप्रिल महिन्यात चिनी सैन्याने भारतीय हद्दीत अतिक्रमण केले होते. चीनच्या या आक्रमकतेला भारतीय सैन्याने गलवान खोऱ्यात 'जशास तसे' प्रत्युत्तर दिले.
-
चीनने कुठलीही आगळीक केल्यास, त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचे लष्कर, नौदल आणि एअर फोर्स पूर्णपणे अलर्ट आहे.
-
कुठल्याही क्षणी कारवाई करण्यासाठी तयार रहा, असे आदेश जिनपिंग यांनी चिनी सैन्याला दिले आहेत.
-
सीमेवरील तणावपूर्ण स्थिती कायम असताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुन्हा एकदा आक्रमक विधान केले आहे.
-
सैन्याने पूर्णवेळ युद्धासाठी सज्ज असले पाहिजे, यावर त्यांचा भर आहे. पूर्णवेळ सज्ज राहण्यासाठी, प्रत्यक्ष युद्ध वातावरणात सराव आणखी वाढवा असे त्यांनी सैन्यदलाला आवाहन केले.
-
मागच्यावर्षी जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याने चीनला चांगलाच धडा शिकवला. (संग्रहित छायाचित्र)
-
कुठल्याही क्षणी कारवाईसाठी पीपल लिबरेशन आर्मी तयार असली पाहिजे. पूर्णवेळ युद्धजन्य परिस्थितीसाठी तुम्ही स्वत:ला तयार केले पाहिजे. प्रशिक्षण सरावामध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करा, असे जिनपिंग म्हणाले. पीएलए आर्मी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचा भाग आहे.
-
मागच्यावर्षी जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याने चीनला चांगलाच धडा शिकवला.
-
दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये ठरल्यानंतरही चिनी सैन्य माघार घेत नव्हते, त्यावेळी गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात चीनचे अनेक सैनिक मारले गेले. (AP Photo)
-
चीनचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून तसेच सीएमसीचे प्रमुख झाल्यापासून शी जिनपिंग पीएलएला युद्धासाठी तयार करण्यावर भर देत आहेत. (Photo: AP)
-
भारताप्रमाणेच चीनचे दक्षिण चीन सागरातही अमेरिका आणि तैवान बरोबर वाद सुरु आहेत.
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?