-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पवनी व ब्रम्हपुरी येथे गोसीखुर्द प्रकल्पाची पाहणी केली.
-
यावेळी त्यांच्यासोबत आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव अजय मेहता यांच्यासहित अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.
-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ब्रम्हपुरी येथे घोडझरी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आले असता शेतकरी व प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्री यांचा ताफा अडविला.
-
ताफा अडवल्यानंतर शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश पाहून उद्धव ठाकरे स्वत: गाडीतून बाहेर आले.
-
यावेळी शेतकऱ्यांनी १५ वर्षांपासून आम्हाला एक थेंब पाणी मिळालं नाही, मोबदला मिळाला नाही अशी व्यथा मांडली.
-
यावेळी घोषणा होत असतानाही उद्धव ठाकरे यांनी संयमाने त्यांच्याशी चर्चा करुन समस्या जाणून घेतली.
-
मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली व याबाबत माहिती घेतो आणि सर्व कामे मार्गी लावतो असं आश्वासन दिलं.
-
यावेळी एकाने आपण हायकोर्टात याचिका दाखल केली असल्याची माहिती दिली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडून वकिलांचा नंबरही लिहून घेतला.
-
यानंतर उद्धव ठाकरे कार्यक्रमासाठी रवाना झाले.
-
दरम्यान गोसीखुर्द प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करा, भूसंपादनाची कामे तात्काळ पूर्ण करून सिंचनातून कृषी व पर्यटन क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
-
उद्धव ठाकरे यांनी ब्रम्हपुरी येथे घोडाझरी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याजवळच बैठक घेवून प्रकल्पाविषयीची माहिती जाणून घेतली. तसंच गोसीखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आजपर्यंत झालेली कामं, या प्रकल्पामुळे विकसित होणारी सिंचन क्षमता याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली.
-
त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेवून गोसीखुर्द प्रकल्प यापुढे न रखडता सर्व घटकांच्या सहकार्याने डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण झाला पाहिजे यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे नियोजन करावे. हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करून विदर्भातील जनतेला सिंचनासाठी मोठा लाभ मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
-
(संग्रहित छायाचित्र)
-
विकासाची कामे करताना पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?