-
जगामध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये मुंबई दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये फारशी वाहतूक नसतानाही मुंबई या नकोश्या यादीत जगात दुसऱ्या स्थानी आहे.
-
सन २०२० मधील सर्वाधिक वाहतूक कोंडींच्या शहरांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये मॉस्को हे एकमेव शहर मुंबईपेक्षा अधिक वाहतूक कोंडी असणारं शहर ठरलं आहे.
-
टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये जगभरातील ५७ देशांमधील ४१६ शहरांचा अभ्यास केल्यानंतर ही यादी जाहीर केली आहे.
-
सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये भारतामधील आणखीन दोन शहरांचाही समावेश आहे. या यादीमध्ये बंगळुरु सहाव्या तर दिल्ली आठव्या स्थानी आहे.
-
मुंबईमधील वाहतूक कोंडीची परिस्थिती दर वर्षाला बिकट होत असल्याचे चित्र या आकडेवारीमधून दिसून येत आहे. सन २०१९ आणि २०१८ च्या यादीमध्ये मुंबई चौथ्या स्थानी होती. मात्र यंदा मुंबईने दुसऱ्या स्थानी झेप घेतलीय.
-
मुंबईच्या उलट बंगळुरुमधील वाहतूक कोंडीचं प्रमाण कमी होताना दिसत आहे. मागच्या वर्षी पाचव्या स्थानी असणारं बंगळुरु शहर यंदा सहाव्या स्थानी आहे.
-
सध्या ५१ टक्के वाहतूक कोंडी असणाऱ्या ंबंगळुरुमध्ये २०१९ मध्ये ७१ टक्के वाहतूक कोंडी असायची.
-
टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या अहवालानुसार मुंबईमधील वाहन चालकांचा वाहतूक कोंडीमुळे सर्वसाधारण वेळेपेक्षा ५३ टक्के अधिक वेळ प्रवासामध्ये जातो.
-
मुंबईप्रमाणेच या यादीमध्ये फिलिपिन्समधील मनिला, कंबोडियामधील बोगोटा, रशियामधील मॉस्को आणि नोव्होसीबीर्स, युक्रेनमधील कॅव्ही, पेरुमधील लिमा, टर्कीमधील इस्तंबूल आणि इंडोनेशियामधील जकार्ता शहराचा समावेश आहे.
-
जगभरातील ४०० हून अधिक शहरांमधील वाहतूक कोंडीवर अभ्यास केल्यानंतर मुंबईला दुसरं सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारं शहर म्हणून घोषित करण्यात आलं असलं तरी एक समाधानकारक बाब सुद्धा या अहवालामध्ये नमूद करण्यात आली आहे. यादीमध्ये मुंबईने दोन स्थानांनी झेप घेतली असली तरी मुंबईतील वाहतूक कोंडीचे प्रमाण हे मागील वर्षीपेक्षा १२ टक्क्यांनी कमी आहे.
-
टॉमटॉमचे अधिकारी असणाऱ्या पराग बेडारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईसहती जगभरातील अनेक मोठ्या शहरांमध्ये यंदा वाहतूक कोंडीचं प्रमाण घटण्यामागील प्रमुख कारण हे करोना लॉकडाउनमुळे लागू करण्यात आलेला लॉकडाउन हे आहे.
-
मुंबईतील वाहतूक कोंडीचा अभ्यास केल्यानंतर सकाळच्या वेळेतील वाहतूक कोंडी ही २०२० मध्ये १८ टक्क्यांनी तर संध्याकळच्या वेळातील वाहतूक कोंडी ही १७ टक्क्यांनी कमी झाल्याचं बेडारकर सांगतात.
-
करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अनेक कंपन्यांनी घरुन काम करण्याची मूभा दिल्याने मुंबईसहीत सर्वच शहरांमधील वाहतूक कोंडीच समस्या थोड्याफार प्रमाणात कमी झाल्याचं पहायला मिळालं, असंही बेडारकर यांनी नमूद केलं आहे.
-
टॉमटॉम कंपनी मोठ्या शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांबरोबरच सरकारलाही या वाहतूक कोंडीसंदर्भातील माहितीच्या आधारे मदत करते.
-
सरकारी यंत्रणांना अधिक चांगल्याप्रकारे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे, सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचे नियोजन करण्यासाठी ही माहिती पुरवली जाते. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. फोटो सौजन्य : पीटीआय आणि रॉयटर्स)
![Mesh To Meen Zodiac signs Daily Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Mesh-To-Meen-Zodiac-signs-Daily-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?