-
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे बुधवारी अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. तर कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील.
-
ट्रम्प समर्थकांनी कॅपिटल हिलमध्ये (अमेरिकेच्या संसद भवन परिसरामध्ये) ६ जानेवारी केलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.
-
बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे.
-
अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स हे १२ वाजता (स्थानिक वेळेनुसार) कॅपिटलच्या वेस्ट फ्रण्टवर बायडेन यांना राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ देतील.
-
शपथविधी सोहळ्याची पारंपारिक जागा असून या ठिकाणी नॅशनल गार्ड्सचे २५ हजारांहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात असतील.
-
ट्रम्प यांच्या समर्थकांनी दोन आठवड्यापूर्वी केलेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अधिक प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
-
हजारो सैनिक या ठिकाणी असल्याने या परिसराला लष्करी छावणीचे स्वरुप आले आहे.
-
व्हाइट हाऊसकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.
-
अनेक ठिकाणी बॅरिकेट्स टाकून अशापद्धतीने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जातेय.
-
व्हाइट हाऊस आणि कॅपिटॉल परिसरात हजारोच्या संख्येने सैनिक आहेत.
-
या ठिकाणी २४ तास जागता पहारा दिला जात आहे.
-
विशेष डॉग स्कॉडही तैनात करण्यात आलं आहे.
-
या ठिकाणी वारंवार तपासणी केली जात असून कोणत्याही पद्धतीचा गोंधळ उडू नये म्हणून सर्व खबरदारी घेतली जात आहे.
-
कॅपिटलच्या वेस्ट फ्रण्टवरही सर्व तयारी पूर्ण झालीय.
-
शपथविधी सोहळ्याच्या एक दिवस आधीच येथे १५ हजार अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेत.
-
बायडेन हे आपल्या कुटुंबाचा वारसा असणाऱ्या १२७ वर्ष जुन्या बायबलच्या साक्षीने शपथ घेतील. बायडेन शपथ घेत असतानाच त्यांची पत्नी म्हणजेच अमेरिकेच्या नव्या फर्स्ट लेडी जिल बायडेन या हातात बायबल घेऊन उभ्या असतील.
-
७८ वर्षीय बायडेन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरणार आहेत. विशेष म्हणजे बायडेन यांनी आपला राजकीय प्रवास सुरु केला होता तेव्हा ते सर्वात कमी वयाचे खासदार म्हणून निवडून आले होते.
-
बायडेन हे शपथ घेतल्यानंतर लगेचच अमेरिकन नागरिकांना राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिलं अध्यक्षीय भाषण करतील. हे भाषण भारतीय वंशाच्या विनय रेड्डी यांनी लिहिलं आहे. हे भाषण राष्ट्रीय एकतेसंदर्भात भाष्य करणारं असेल असं सांगितलं जात आहे.
-
कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणाऱ्या पहिल्या महिला तसेच दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या कृष्णवर्णीय व्यक्ती ठरणार आहेत.
-
कमला हॅरिस यांना सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या लॅटीन सदस्य असणाऱ्या न्या. सोनिया सोटोमेयर उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ देतील.
-
सोटोमेयर यांनीच बायडेन यांना २०१३ साली उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ दिली होती.
-
कमला हॅरिस या दोन बायबल घेऊन शपथ घेतील. यापैकी पहिलं बायबल हे हॅरिस कुटुंबाचे जवळचे मित्र रेगिना शेल्टन यांचं असेल तर दुसरं सर्वोच्च न्यायालयातील आफ्रीन वंशाचे पहिले न्यायाधीश ठरलेल्या थुरगूड मार्शल यांचं बायबल असेल.
-
अमेरिकेमध्ये होत असणारं हे सत्तांतर हे राजकीय वाद आणि हिंसेसाठी ओळखलं जाईल. सामान्यपणे निवडणुकांनंतर सत्तांतरणाची प्रक्रिया सुरु होते. मात्र सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन नोव्हेंबर रोजी समोर आलेल्या निवडणुकीचे निकाल स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळेच निकालानंतर अनेक आठवड्यांनी सत्तांतरणाची प्रक्रिया सुरु झाली.
-
ट्रम्प स्वत: या शपथविधीसाठी उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. यामुळे नवीन राष्ट्राध्यक्षांच्या स्वागत जुन्या राष्ट्राध्यक्षांकडून होण्याची परंपरा खंडित होणार आहे.
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर या शपथविधी सोहळ्यासाठी सर्व सामान्यांना प्रवेश नाकारण्यात आलाय. सामान्यपणे अशा सोहळ्याला नागरिकांना बसण्यासाठी जेथे आसन व्यवस्था असते तेथे अमेरिकेचे झेंडे लावण्यात आलेत.
-
सकाळी ११ वाजता शपथविधीचा कार्यक्रम सुरु होईल. यामध्ये गायिका आणि डान्सर असणारी लेडी गागा ही अमेरिकेचे राष्ट्रगीत गाणार आहे. तर अमांडा गोरमॅन एक खास कविताही सादर करणार आहेत.
-
लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री जेनिफर लोपेजही या कार्यक्रमात कलाकारी सादर करणार आहे. (सर्व फोटो रॉयटर्स आणि एपीवरुन साभार)
![Mesh To Meen Zodiac signs Daily Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Mesh-To-Meen-Zodiac-signs-Daily-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
६ फेब्रुवारी राशिभविष्य: सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष, सिंहच्या कुंडलीत होणार मोठे बदल; पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?