-
राजस्थानमधील बिकानेर येथील महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये सोमवारपासून भारत आणि अमेरिकन लष्कराचा संयुक्त युद्ध सराव सुरु झाला आहे.
-
दोन्ही देशांच्या राष्ट्रध्वजांना या युद्ध अभ्यासामध्ये सहभागी होणाऱ्या सैनिकांनी सलाम करुन या युद्ध अभ्यासाला सोमवार म्हणजेच आठ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली.
-
'युद्ध अभ्यास २०' या नावाने ओळखला जाणारा हा सराव १४ दिवस म्हणजेच दोन आठवडे सुरु राहणार आहे.
-
८ ते २१ फेब्रुवारी दरम्यान अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण आणि सराव भारतीय आणि अमेरिकन लष्करातील जवान राजस्थानमधील या केंद्रावर करणार आहेत.
-
यासाठीची सर्व तयारी भारतीय लष्कराने केली असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.
-
युद्ध अभ्यासाच्या पहिल्याच दिवशी वेगवेगळ्या शस्त्रांसदर्भात चर्चा करताना भारतीय आणि अमेरिकन सैनिक.
-
संयुक्त राष्ट्राच्या धोरणांनुसार दहशतवादाविरोधात लढण्यासंदर्भातील विशेष प्रशिक्षण या सैनिकांना देण्यात येणार आहे.
-
अमेरिकन लष्कराचे जवान एका विशेष विमानाने शनिवारी म्हणजेच सहा फेब्रुवारी रोजी राजस्थानमधील सुरतगढ येथे दाखल झाले.
-
भारतीय लष्कराच्या साऊथ कमांडने दिलेल्या माहितीनुसार भारत आणि अमेरिकेन लष्काराच्या संयुक्त युद्ध अभ्यासाचे हे १६ वे पर्व आहे.
-
भारतात दाखल झालेल्या सर्व अमेरिकन सैनिकांची वैद्यकीय चाचणी केल्यानंतरच त्यांना नियोजित ठिकाणी घेऊन घेण्यात आलं.
-
यंदाचा युद्ध अभ्यास राजस्थानमध्ये होत असून यापूर्वीचा युद्धअभ्यास अमेरिकेतील सिएटल येथे पार पडला होता.
-
या युद्ध अभ्यासाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी चिनुक हेलिकॉप्टर्सनेही सहभाग घेतला.
-
दोन मोठ्या जीप चिनुक हेलिकॉप्टरने अशाप्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्या.
-
चिनुक हे जगातील सर्वात शक्तीशाली हेलिकॉप्टरपैकी एक आहे.
-
दूर्गम ठिकाणी सामान पोहचवण्यासाठी प्रामुख्याने चिनुकचा वापर केला जातो. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा