-
पुढील आठवड्यामध्ये भाजपामध्ये प्रवेश करत आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणारे मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे ई. श्रीधरन यांनी पक्ष प्रवेशआधीच आपल्या राजकीय महत्वकांशांसंदर्भात भाष्य केलं आहे.
-
केरळमध्ये भाजपाची सत्ता आणणं हे आपलं मुख्य उद्दीष्ट असून पक्षाने राज्यात यश मिळवल्यास मी मुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार असेन असंही श्रीधरन यांनी म्हटलं आहे.
-
या वर्षी केरळमध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकल्यास राज्यामध्ये आधारभूत विकास प्रकल्प उभारणे आणि राज्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यास प्राधान्य दिलं जाईल असं श्रीधरन यांनी स्पष्ट केलं आहे.
-
पीटीआयशी बोलताना श्रीधरन यांनी पक्षाने ठरवल्यास आपण विधानसभा निवडणूक लढण्यास आणि त्यानंतर पक्ष विजयी झाल्यास मुख्यमंत्री पद संभाळण्यासही तयार असल्याचे म्हटलं आहे.
-
८८ वर्षीय श्रीधरन यांनी आपल्याला राज्यपाल होण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं आहे. राज्यपाल हे पूर्णपणे संविधानातील तरतुदीनुसार निर्माण करण्यात आलेलं आहे. राज्यपालांकडे काही निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे अशा पदावर राहून मला राज्यासाठी काही सकारात्मक योगदान देता येणार नाही, असं श्रीधरन सांगतात.
-
"माझं मुख्य ध्येय भाजपाला केरळमध्ये सत्तेत आणण्याचं आहे. भाजपाने केरळमध्ये निवडणूक जिंकल्यास राज्यातील दोन तीन महत्वाच्या क्षेत्रांवर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. यामध्ये आधारभूत विकास प्रकल्प राबवणे आणि राज्यात जास्तीत जास्त उद्योगांना आकर्षित करण्यास प्राधान्य दिलं जाईल," असं श्रीधरन म्हणाले.
-
केरळमधील पोन्नालीमध्ये राहणाऱ्या श्रीधरन यांनी पीटीआय भाषाला दिलेल्या टेलिफोनिक इंटरव्ह्यूमध्ये राज्यावरील कर्जासंदर्भातही चिंता व्यक्त केलीय. कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या राज्याची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आम्ही वित्त आयोगाची स्थापना करणार आहोत, असं श्रीधरन यांनी स्पष्ट केलं आहे.
-
"आज राज्य कर्जाच्या जाळ्यात अडकलं आहे. राज्याने अनेक ठिकाणांहून निधी उधारीवर घेतला आहे. प्रत्येक मल्याळी व्यक्तीवर आझ एक लाख २० हजारांचे कर्ज आहे," असा दावा श्रीधरन यांनी केलाय.
-
"राज्याची आर्थिक स्थितीचा अर्थ काढल्यास राज्याचं दिवाळं निघाणार असून त्या दिशेनेच राज्याची आर्थिक वाटचाल सुरु आहे तरीही सरकार अजूनही पैसे उधार घेत आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची गरज आहे आणि आम्ही यावर तोडगा नक्कीच काढू," असा विश्वास श्रीधरन यांनी व्यक्त केला.
-
श्रीधरन यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने पक्षाला केरळमध्ये चांगले व्यासपीठ उपलब्ध होईल. राज्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून अलटून पालटून एलडीएफ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूनायटेड डेमोक्रॅटिक फ्रण्ट म्हणजेच यूडीएफची सत्ता आहे.
-
श्रीधरन यांनी यासंदर्भात बोलताना, "भाजपाने सांगितल्यास मी विधानसभा निवडणूक लढवतेल," असं सांगितलं. त्याचप्रमाणे पक्षाने सांगितलं तर मी मुख्यमंत्री पदही संभाळण्यास तयार आहे असंही श्रीधन म्हणाले.
-
"मुख्यमंत्री पद स्वीकारल्याशिवाय जी प्राथमिक ध्येय डोळ्यासमोर ठेवली आहेत ती पूर्ण करता येणार नाहीत, हे मी आताच सांगू इच्छितो," अशा स्पष्ट शब्दांमध्ये श्रीधरन यांनी आपल्या राजकीय महत्वकांशा बोलून दाखवल्या आहेत.
-
श्रीधनर हे अधिकृतरित्या २५ फेब्रुवारी रोजी भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
-
तुम्ही पक्ष म्हणून भाजपाची निवड का केली असा प्रश्न विचारला असता श्रीधरन यांनी केरळच्या लोकांना फायदा झाला पाहिजे असं मला वाटतं. सध्या सत्तेत असणाऱ्या यूडीएफ आणि एलडीएफकडे राज्याचा विकास करण्याची क्षमता नाहीय असं श्रीधरन म्हणाले.
-
"मी एका वेगळ्या कारणासाठी भाजपाची निवड केली. केरळमध्ये दोन्ही यूडीएफ आणि एलडीएफ आलटून पालटून सत्तेत येतात. त्यांना खरं तर राज्याचा विकास करता येत नाहीय. मागील २० वर्षांमध्ये राज्यात एकही उद्योग आलेला नाहीय," अशी टीका श्रीधरन यांनी केली.
-
वेगवेगळ्या मुद्द्यावर राज्यातील सरकारचे केंद्राशी वाद सुरु असतात. दोन्हीकडील सरकारचे अनेक मुद्द्यांवर एकमत नाहीय. याचा परिणाम राज्याच्या विकासावर होतोय. आज केरळमध्ये भाजपा सत्तेत आली तर राज्य सराकरचे केंद्राशी चांगले संबंध निर्माण होतील, असा विश्वास श्रीधरन यांनी व्यक्त केला. सध्या श्रीधरन हे एका पुलाच्या बांधकामाच्या प्रकल्पावर काम करत असून फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ते आपल्या सेवेतून निवृत्त होणार आहेत. (सर्व फोटो सोशल मिडियावरुन साभार)

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक