-
मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहेत. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कारप्रकरणातून त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. थेट विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेंविषयी आक्षेप घेतला आहे!
-
(संग्रहित छायाचित्र)
-
सचिन वाझे १९९०मध्ये मुंबई पोलिसात सब इन्स्पेक्टर अर्थात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. त्यांच्या कामाच्या आक्रमक पद्धतीमुळे ते एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून अल्पावधीत चर्चेत आले.
-
आपल्या कारकिर्दीत सचिन वाझे यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा राजन, मुन्ना नेपाली अशा अनेक गँगस्टर्सच्या गँगमधल्या सदस्यांचा एन्काऊंटर केला आहे. या एन्काऊंटर्सचा आकडा ६३पर्यंत जातो म्हणे!
-
मुंबईतले दुसरे एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि सध्या शिवसेनेत असलेले प्रदीप शर्मा हे सचिन वाझेंचे मेंटॉर अर्थात गुरू होते. त्यामुळे गुरुच्याच पावलावर पाऊल ठेऊन सचिन वाझेंनीही २००७मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता.
-
२००३मध्ये ख्वाजा युनूस नावाच्या घाटकोपर ब्लास्ट प्रकरणातील संशयिताचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी सचिन वाझेंना २००४मध्ये सस्पेंड करण्यात आलं होतं. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला.
-
तब्बल १३ वर्ष शिवसेनेत काढल्यानंतर म्हणजे २०२०मध्ये सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तवार्ता पथकाच्या (CIU) प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.
-
अँटिलियाबाहेर स्फोटकं सापडल्यानंतर ते प्रकरण आधी सचिन वाझेंकडे देण्यात आलं होतं. नंतर ते त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं. असं का करण्यात आलं? असाही सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे.
गडगंज श्रीमंती लाभणार, मंगळ करणार शनीच्या नक्षत्रात प्रवेश; ‘या’ तीन राशींची होणार चांदी