-
राज्यात करोनाच्या गंभीर होत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. (सर्व फोटो – पवन खेंगरे, इंडियन एक्सप्रेस)
-
अत्यावश्यक सेवांसह शासनाने मुभा दिलेल्या व्यक्ती वगळता नागरिकांना जिल्हा आणि राज्याबाहेरील प्रवासासाठी पोलीस परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
-
कुटुंबीयाचा मृत्यू आणि वैद्यकीय आणीबाणी या दोनच कारणांसाठी राज्याबाहेरील प्रवासास परवानगी देण्यात येणार आहे.
-
लोकांनी केवळ आपल्या घरातच राहावं, असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. परंतु कोणत्याही अति महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर जायचं असल्यास राज्य सरकारांनी नागरिकांना ई-पास देण्याची सुविधा सुरू केली आहे.
-
हा पास तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीनं राबवण्यात येत आहे. या पासद्वारे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास परवानगी मिळणार आहे.
-
विनाकारण घराबाहेर पडण्यावर बंदी आहे. यादरम्यान पोलीस यंत्रणेवरची जबाबदारी पुन्हा वाढली आहे.
-
शिवापूर टोल नाका येथे पोलिसांनी नाकाबंदी करत सर्वांची कसून चौकशी करायला सुरुवात केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही या काळात घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
-
ई-पाससाठी अर्ज करता यावा, अर्जावरील निर्णय तपासता यावा यासाठी राज्य पोलीस दलाने ‘कोविड१९.एमएचपोलीस.इन’ असे संके तस्थळ तयार केले आहे. त्यावरील अर्जात वैयक्तिक माहितीसह प्रवासाचे कारण, कारणाचे तपशील, वाहन प्रकार, सहप्रवासी, प्रवासाचे ठिकाण आदी तपशील नमूद करणे बंधनकारक आहे.

सुरक्षा रक्षकांना आता ‘खाकी वर्दी’, शासनाची मान्यता; महाराष्ट्रात १ मेपासून…