-
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यावर सरकार ठाम आहे. मात्र स्थानिकांना त्याचा विरोध आहे. (सर्व फोटो: नरेंद्र वासकर)
-
या विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची कृती समितीची मागणी कायम आहे.
-
याच मागणीसाठी आजपासून मानवी साखळी करुन आंदोलन करण्यात आलं.
-
या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकीत बुधवारी तोडगा निघू शकला नाही. आपल्या मागणीसाठी कृती समितीच्या वतीने ते आज रायगडमध्ये आंदोलन करण्यात आले.
-
नवी मुंबई विमानतळास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याबाबतचा ठराव सिडकोच्या संचालक मंडळाने १७ एप्रिल रोजी मंजूर केला आहे. या ठरावाला स्थानिकांचा विरोध आहे.
-
सरकारच्या ठरावानुसार राज्यंत्रिमंडळळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देत तो केंद्राला पाठविला जाणार आहे. पण विमानतळाच्या नावावरुन सरकार आणि स्थानिक आमने सामने आलेत.
-
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची स्थानिकांची मागणी आहे. त्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यातून पाठपुरावा सुरू आहे.
-
सिडकोच्या निर्णयाविरोधात आंदोलनाची घोषणा स्थानिकांनी केल्यांतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे कृती समितीला चर्चेसाठी बुधवारी (९ जून २०२१ रोजी) पाचारण करण्यात आले होते.
-
त्यावेळी विमानतळास ठाकरे यांचेच नाव देण्याचा निर्णय झाला असून दि.बा. पाटील यांच्याबाबतही सरकारला आदर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं.
-
सरकारचा निर्णय झाला असल्याने दि.बा. पाटील यांच्या नावाबाबतचा अन्य प्रस्ताव द्यावा. सरकार त्याचा नक्की विचार करेल असे सांगत मुख्यमंत्र्यांनी समितीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
-
विमानतळास दि.बा यांचेच नाव द्यावे अन्यथा आंदोलन छेडले जाईल अशी भूमिका आमदार प्रशांत ठाकूर व अन्य पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही.
-
आम्ही भूमिकेवर ठाम असून गुरुवारपासून सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून मानवी साखळी आंदोलन सुरु करण्यात येईल असं ठाकूर यांनी सांगितलेलं. त्याप्रमाणे आजपासून आंदोलन सुरु झालं.
-
या आंदोलनादरम्यान शेकडो आंदोलक आज सकाळी नवी मुंबईमध्ये रस्त्याच्या बाजूला मानवी साखळी करुन घोषणा देत होते.
-
पनवेल- बेलापूर,नवी मुंबई, दिघा, ठाणे आदी ठिकाणी हे मानवी साखळी आंदोलन सुरु करण्यात आलंय.
-
२४ जून रोजी सिडकोला घेराव घालण्यात येणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले आहे.

Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज