-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी एकामागोमाग एक राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे एकीकडे महाराष्ट्रातील नवीन मंत्र्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच सध्याच्या मोदींच्या मंत्रीमंडळातील महाराष्ट्रातील दोन राज्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेत. राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांमध्ये कोणते मंत्री आहेत पाहूयात…
-
ओडिशातील बालासोर मतदारसंघातून खासदार झालेले प्रतापचंद्र सारंगी यांनी सुद्धा आपल्या राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय.
-
महिला व बाल विकास खात्याच्या राज्यमंत्री देबश्री चौधरी यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे. देबश्री चौधरी यांना पंतप्रधानांनी राजीनामा देण्यास सांगितलं असल्याची चर्चा सुरू होती.
-
त्याचबरोबर केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ते बरेली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
-
केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनीही राजीनामा दिला आहे.
-
राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांच्या यादीत राज्यमंत्री अश्विनी चौबे यांच्या नावाचाही समावेश आहे.
-
राजीनामा देणाऱ्या मोठ्या नेत्यांमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांचाही समावेश आहे.
-
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनीही राजीनामा दिलाय.
-
केंद्रीय रसायने व खते मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनाही आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय.
-
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची कालच मंत्रिमंडळातून गच्छंती करण्यात आली होती.
-
रवि शंकर प्रसाद यांनीही राजीनामा दिला असल्याचं निश्चित झालं आहे.
-
रवि शंकर प्रसाद हे केंद्रीय कायदा मंत्री होते.
-
दानवेंबरोबरच महाराष्ट्रातील भाजपाचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सुद्धा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. राज्यमंत्री धोत्रे यांच्याकडे मनुष्यबळ विकास, दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान या खात्यांची जबाबदारी होती.
-
प्रकाश जावडेकरांनाही राजीनामा दिलाय.
-
प्रकाश जावडेकर केंद्रीय माहिती व प्रसारण आणि अवजड उद्योग मंत्री होते.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा संधी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य