-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून यामध्ये प्रामुख्याने राज्यातील एका नावाची रंगली आहे ती म्हणजे नारायण राणे यांची. महाराष्ट्रातील ज्या चार नेत्यांनी मंत्रीपद मिळणार आहे त्यामध्ये नारायण राणे यांचं नाव आघाडीवर होतं. दरम्यान यानिमित्ताने नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रीपदापर्यंतचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. (File Photos/ Narayan Rane Facebook)
-
कोकणचा वाघ अशी प्रतिमा असलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास त्यांच्या स्वभावाप्रमाणेच आक्रमक आहे. एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला.
-
मुंबईतील चेंबूर येथील घाटला गावात राहणारे नारायण राणे शिवसेनेचे शाखाप्रमुख झाले आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरवात झाली.
-
आक्रमकता आणि मातोश्रीशी असलेली निष्ठा या जोरावर नारायण राणे शिवसेनेत वेगाने एक एक पायरी चढत गेले.
-
घाटला गावातील बाळासाहेबांचा हा लाडका शिवसैनिक मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेला.
-
पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत बेघर झालेल्यांसाठी चागंली पक्की घरं देण्याची योजना राबवली जाईल, असंही राणेंनी सांगितलं आहे. (संग्रहीत छायाचित्र)
-
१९९० साली राणे पहिल्यांदा कणकवली मतदार संघातून निवडून आले आणि आमदार नारायण राणे झाले.
-
पुढे १९९५ साली युतीचा सरकार आल्यावर त्यांच्याकडे दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय , उद्योग, विशेष सहाय्य आणि पुनर्वसन अशा खात्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून पदभार देण्यात आला.
-
१९९७ साली नारायण राणे यांच्यावर महसूल विभागाची अत्यंत महत्वाची जबाबदारी देण्यात आली.
-
१९९८ साली नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री झाले.
-
१९९८ ते १९९९ या काळासाठी नारायण राणे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
-
बाळासाहेबांशी असलेली निष्ठा आणि कडवट शिवसैनिक हे दोन गुण त्यांना महाराष्ट्रातील सर्वोच्च पदापर्यंत घेऊन गेले.
-
मात्र महत्त्वाकांक्षा राणे यांना स्वस्थ बसू देईनात. २००५ साली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सक्रिय प्रवेशानंतर अस्वस्थ असलेल्या राणे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून काँग्रेसचा हात पकडला.
-
उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपली दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी गेली, असे राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केलं आहे.
-
१९९९ मध्ये विरोधी पक्षनेते असलेल्या नारायण राणे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार पाडण्याच पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, त्याला उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षित साथ मिळाली नाही, असंही नारायण राणे यांचे म्हणणे आहे.
-
काँग्रेसनं त्यांना राज्याच्या उद्योगमंत्रीपदाची जबाबदारी दिली. मात्र अपेक्षित असलेलं मुख्यमंत्रीपद सतत हुलकावणी देत असल्यामुळे राणे यांची काँग्रेसमध्ये घुसमट सुरू झाली.
-
अखेर नारायण राणे यांनी काँग्रेसचा हात सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला. पण राणेंचा हा प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही आणि राणे यांनी स्वतःच्याच पक्षाचा राजीनामा देऊन भाजपचं कमळ हाती घेतलं.
-
भाजपाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी देत खासदार केलं.
-
आणि आता प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नारायण राणे यांची नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे.

Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार