-
केरळमधील इडूक्की न्यायालयाबाहेर स्थानिकांनी एका आरोपीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. (सर्व फोटो : एएनआयवरुन साभार)
-
एका सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या आरोपीला पुरावे गोळा करण्यासंदर्भात न्यायालयामध्ये आणण्यात आलं असता स्थानिकांनी त्याच्यावर हल्ला केला.
-
चुरुकुला येथे काही दिवसांपूर्वी एक ६ वर्षांची मुलगी तिच्याच घरामध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत आढळली होती. या मुलीचे शवविच्छेदन करुन वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी तपास करुन या आरोपीला ताब्यात घेतलं.
-
सहा वर्षाच्या निष्पाप मुलीवर बलात्कार करुन तिचा जीव घेणाऱ्याविरोधात न्यायालयाच्या आवारातच स्थानिकांचा आक्रोश दिसून आला. न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्थानिकांची एवढी गर्दी झाली या आरोपीला खिडकीमधून बाहेर काढण्याची वेळ पोलिसांवर आली.
-
पुराव्यांसाठी न्यायालयामध्ये नेलेल्या आरोपीला स्थानिकांच्या आक्रोशामुळे खिडकीमधून न्यायालयाबाहेर काढण्याची वेळ पोलिसांवर आल्याची चर्चा काल दिवसभर इडूक्कीमध्ये रंगली होती.

१ एप्रिल राशिभविष्य: अंगारकी विनायक चतुर्थीला बाप्पा कोणत्या राशीच्या पाठीशी उभा राहणार? कोणाला फायदा तर कोणाची इच्छापूर्ती होणार