-
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी रविवारी मंत्रीमंडळामध्ये नव्याने सहभागी झालेल्या महिला मंत्र्यांना चहापानासाठी आमंत्रित केलं होतं.
-
या कार्यक्रमासाठी मंत्री मंडळामध्ये नव्याने सहभागी झालेल्या सात महिला नेत्यांसोबतच कॅबिनेट मिनिस्टर असणाऱ्या स्मृती इराणीही उपस्थित होत्या.
-
मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये असणाऱ्या साधवी निरंजन ज्योती, रेणुका सिंगसुद्धा या अनौपचारिक कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
-
निर्मला सीतारमन यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये महिला नेत्यांनी बऱ्याच विषयांवर अनौपचारिक चर्चा केली.
-
सर्व महिला नेत्या घोळका करुन हसत गप्पा मारतानाचा हा फोटोही चांगलाच व्हायरल झालाय.
-
अनेक महिला नेत्यांनी त्यांना मंत्रीमंडळामध्ये सिनियर असणाऱ्या निर्मला सीतारमन यांच्यासोबत फोटो काढून घेतला.
-
मंत्रिमंडळात एकूण ११ महिला आहेत. यापैकी सात जणींना नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात समावेश करण्यात आला असून निरंजन ज्योती, रेणुका सिंग निर्मला सीतारमन आणि स्मृती इराणी या चार जणी आधीपासूनच मंत्रीमंडळात आहेत.
-
मागील आठवड्यामध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारामध्ये सात नवीन महिला नेत्यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.
-
अनुप्रिया पटेल (उत्तर प्रदेश), शोभा करंदळजे (कर्नाटक), दर्शना जरदोश (गुजरात), मिनाक्षी लेखी (नवी दिल्ली), अन्नपूर्णा देवी (झारखंड), प्रतिमा भौमिक (त्रिपुरा) आणि भारती पवार (महाराष्ट्र) यांनी बुधवारी मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
मोदींच्या मंत्रीमंडळातील ११ पैकी ९ नेत्या या राज्यमंत्री आहेत. निर्मला सीतारमन आणि स्मृती इराणी कॅबिनेट मंत्री आहेत.

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…