-
दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्या अटकेनंतर देशामध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. (सर्व फोटो : रॉयटर्सवरुन साभार)
-
झुमा यांच्या समर्थकांनी मागील आठवड्यापासून अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर उतरुन हिंसक आंदोलन सुरु केलं आहे.
-
मागील आठवड्यापासून दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असणाऱ्या या आंदोलनामध्ये आतापर्यंत ७२ जणांचा प्राण गेलाय.
-
भ्रष्टाचार प्रकरणातील एका तपासात सहभागी न झाल्याने झुमांना १५ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर हा हिंसाचार उफाळून आलाय.
-
मागील काही वर्षांमधील हा दक्षिण आफ्रिकेतील सर्वात हिंसक काळ असून सध्या देशातील राजकीय वातावरण हे अस्थिर आहे.
-
मागील अनेक वर्षांमधील हे दक्षिण आफ्रिकेतील सर्वात हिंसक आंदोलन असल्याचं सांगण्यात येत आहे.
-
राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराविषयीच्या तपासात पुरावे देण्याची सूचना न्यायालयाने झुमा यांना दिली होती. मात्र त्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.
-
त्यानंतर कायदेशीर कारवाई करत झुमा यांना गेल्या आठवड्यात त्यांना अटक करण्यात आली आणि हिंसा सुरु झाली.
-
झुमा यांना अटक होऊ नये यासाठी त्यांच्या समर्थकांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली होती.
-
४ जुलैला झुमा यांनी शरण येणार नसल्याचं सांगितलं होतं. मात्र न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली. आणि हिंसा सुरु झाली.
-
झुमा यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी हिंसक आंदोलन सुरु केलं आहे.
-
ठिकठिकाणी झुमा यांच्या समर्थकांचा उद्रेक पाहायला मिळत आहे.
-
अनेक ठिकाणी पोलीस आणि समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
-
दुकाने, गोदामे, ट्रक्सला आग लावण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत.
-
मोठमोठ्या गोदामांनाही आंदोलकांनी लक्ष्य करत जाळपोळ केलीय.
-
अनेक शहरांमध्ये लुटमारीचे प्रकारही समोर आले आहेत.
-
करोना काळात वाढलेली गरीबी आणि आर्थिक निर्बंधामुळे आधीच देशात अशांततेचं वातावरण होतं त्यात या अटकेमुळे वातावरण आणखीन तापलं. झुमा यांच्या अटकेनंतर भर पडली आहे.
-
दुकानेच्या दुकाने लोकांनी लुटून नेल्याचं चित्र अनेक शहरांमध्ये दिसत आहे.
-
लुटमार केल्यानंतर अशाप्रकारे ट्रॉलींमधून अनेकजण सामान घरी नेताना दिसत आहेत.
-
काही ठिकाणी तर मोठ्या आकाराच्या वस्तुही आंदोलकांनी लुटल्याचं चित्र दिसत आहे.
-
वाढत्या हिंसाचारामुळे दुकानं, पेट्रोल पंप आणि सरकारी इमारती बंद करण्यात आल्या आहेत.
-
या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत (१५ जुलै २०२१ पर्यंत) १७०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.
-
अनेक ठिकाणी गाड्या रस्त्यामध्ये अडवून अशाप्रकारे पेटून देण्यात आल्यात.
-
मोठमोठ्या गोदांमांना आग लावून आंदोलनाच्या नावाखाली लूटमार केली जात आहे.
-
अनेक ठिकाणी असे धुराचे लोट दिसून येत आहेत. फोटोंमध्ये जाळत असणाऱ्या इमारती या मोठी गोदामं आहेत.
-
गोदामांमध्ये वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या मोठ्या कंटेनर्सवरही हल्ले केले जात आहेत.
-
जबरदस्तीने कंटेनर उघडून सामानाची चोरी केली जात आहे.
-
काही ठिकाणी हे ट्रक्स अशापद्धतीने जाळून टाकण्यात आलेत.
-
अराजकता कशाला म्हणतात याची प्रचिती सध्या दक्षिण आफ्रिकेतील ही दृष्य पाहून येत आहे.
-
अनेक ठिकाणी मॉल्समध्येही तोडफोड करुन लूटमार करण्यात आलीय.
-
काही ठिकाणी मॉल्सला आगही लावण्यात आलीय.
-
हा एका मॉलचा दर्शनी भाग आहे, असं सांगितल्यास त्यावर विश्वास ठेवणं कठीण जाईल.
-
वेगवेगळ्या शहरांमध्ये एटीएमसही फोडण्यात आली आहेत.
-
आंदोलनाच्या नावाखाली झुंडीने मॉल्स, दुकाने, गोदामांवर हल्ले केला जात आहेत.
-
हल्ला करुन तोडफोड करायची आणि वाटेल ते सामान उचलून पळून जायचं असं चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे.
-
सर्वच दुकानांमध्ये आंदोलनाच्या नावाखाली तोडफोड करण्यात आल्याने मोठं नुकसान झालं आहे.
-
लुटमार करुन मॉलमधून पळ काढणारे आंदोलक
-
मॉलला आग लावल्यानंतर त्याचा उरलेला धातूचा सांगाडा.
-
सगळं काही ठप्प असून केवळ आणि केवळ लुटमार सुरु असल्याचं चित्र हवेमधून काढलेल्या या फोटोमध्येही दिसत आहे.
-
लहान सामानच नाही तर फ्रीजसारख्या गोष्टीही लोक चोरुन नेत आहेत
-
अनेक शहरांमध्ये रस्त्यांच्याकडेला अशाप्रकारे सामान पडल्याचं चित्र दिसत आहे.
-
कंटेरनर्स रस्त्यात आडवून लुटमार केली जात आहे.
-
गोदामे पेटून देण्यात आली आहेत.
-
दिवसाच नाही रात्री सुद्धा हा हिंसाचार सुरु असतो.
-
मोठ्याप्रमाणात सुरक्षा दलांना तैनात करण्यात आलं असून १७०० हून अधिक जणांना मागील ११ दिवसांमध्ये अटक करण्यात आलीय.
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा