-
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या आजपासून तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी लखनौमध्ये जोरदार तयारी करण्यात आलीय.
-
आज दुपारच्या सुमारास प्रियंका लखनौमध्ये दाखल होणार असल्याने शहरामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.
-
मात्र प्रियंका यांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेली ही बॅनरबाजी जास्त प्रमाणात झाल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
-
अनेक ठिकाणी तर अगदी कमी उंचीवर पताके बांधण्यात आले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने प्रियंका यांचं स्वागत करणारे बॅनर लावण्यात आलेत.
-
ट्विटरवर यासंदर्भात अनेकांनी अशापद्धतीने नाराजी व्यक्त केलीय.
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं विधान, “शरद पवारांची गुगली भल्याभल्यांना कळत नाही, त्यांनी मला…”