-
राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत.
-
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, ज्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत, त्यामध्ये काही गोष्टींवरील निर्बंध हटवले जाणार आहेत.
-
ज्या जिल्ह्यांमध्ये करोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे तेथे सर्व अत्यावश्यक सेवांच्या दुकानांसह अन्य दुकानांनाही अधिक वेळ सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे
-
करोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या २५ जिल्ह्यांमध्ये थिएटर, सिनेमा हॉल सुरु करण्यास परवानगी देण्यात येऊ शकते
-
व्यायामशाळांनादेखील सवलत देण्यात येईल, असे टोपे यांनी सांगितले.
-
रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत हॉटेल्स व दुकानांची वेळ वाढवण्यात येणार आहे. तेथील कर्मचार्यांयचे संपूर्ण लसीकरण केले आहे याची खात्री करुन ही परवानगी देण्यात येणार आहे
-
२५ जिल्ह्यांमध्ये सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूकीचे कार्यक्रम ५० टक्के उपस्थित पार पाडता येणार आहेत
-
सार्वजनिक ठिकाणे मर्यादेसह शनिवारी खुली असतील, पण रविवारी निर्बंध कायम राहतील असे टोपे म्हणाले.
-
लग्नसोहळ्यासाठी निर्बंध कायम राहतील. एसी हॉलचा वापर करण्यास परावृत्त करू असे महाराष्ट्र आरोग्यमंत्री म्हणाले.
-

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…