-
सध्याच्या काळात आधार कार्ड फार महत्वाचे आहे. एखादे सिमकार्ड घेण्यापासून ते अगदी पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधारकार्डाचा नंबर असणं फार गरजेचे असते.
-
आपल्याला अनेकदा आधारकार्ड संबंधित काही तक्रार करायची असेल किंवा ते तुम्हाला अपडेट करायचे असेल तर काय करायचे असा प्रश्न नेहमी पडतो.
-
मात्र तुम्ही एका फोन किंवा ईमेलद्वारे ही समस्या सोडवू शकता. भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीने याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच आधारशी संबंधित तक्रार कशी करता येईल यासाठी UIDAI ने संपूर्ण प्रक्रियेची माहिती वेबसाईटवर सांगितली आहे.
-
आधार नोंदणी, आधार अपडेट करणे आणि इतर सेवांशी संबंधित तक्रार आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एक संपर्क केंद्र सुरु करण्यात आले आहे. यातील कोणत्याही नावनोंदणी केंद्रात, एनरोलमेंट ऑपरेटर नावनोंदणी प्रक्रियेनंतर रहिवाशांना एक प्रिंटेड स्लिप दिली जाते. त्यावर ईआयडी (नोंदणी क्रमांक) आहे. हा ईआयडी नंबरचा वापर करुन तुम्ही या यूआयडीएआय संपर्क केंद्राशी संपर्क साधू शकतात.
-
तसेच जर आपल्यास आधारशी संबंधित काही तक्रार असेल तर तुम्ही तात्काळ 1947 क्रमांकावर कॉल करु शकता.
-
तसेच ई-मेलद्वारेही तक्रार नोंदवू शकता. help@uidai.gov.in यावर मेलकरुन तुम्ही तुमची समस्या नोंदवू शकता. यूआयडीएआयचे अधिकारी वेळोवेळी हे मेल तपासून लोकांच्या समस्या सोडवतात. ई-मेलला उत्तर देऊन ते आधार कार्डबाबतच्या तक्रारी सोडवण्यास मदत करतात.
-
आधार कार्ड काढण्यासाठी सुरूवातीला UIDAI च्या अधिकृत https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर लॉगिन करा. यानंतर Contact & Support वर क्लिक करा.
-
यात तुमच्या आधार कार्डचा 14 अंकी क्रमांक नोंदवा. यानंतर तुम्हाला दिवस, महिना, वर्ष आणि वेळ नोंदवावा लागेल. यानंतर तुम्हाला लोकेशन टॅबमध्ये जाऊन तुमच्या परिसराचा पिन क्रमांक टाकावा लागेल.
-
त्याखाली तुमच्या गावाचे किंवा शहराचे नाव निवडावे लागेल. यानंतर तुमच्या तक्रारीचा नेमका प्रकार काय, त्याची श्रेणी आणि तुमचे मत याची नोंद करावी लागेल.
-
यानंतर शेवटी तुम्हाला सिक्युरिटी कोड टाकावा लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल.
-
फोन, ई-मेल आणि वेबसाईटशिवाय वापरकर्ते पोस्ट ऑफिसद्वारेही तक्रार नोंदवू शकतात. पण या तक्रारीची एक हार्डकॉपी UIDAI च्या मुख्यालयात पाठवावी लागेल. त्यानंतर अधिकाऱ्यांकडूनी ती तक्रार तपासली जाईल. यानंतर मुख्यालयातून युजर्सला उत्तर पाठवले जाईल.

Zapuk Zupuk: सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख