-
उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंहगड किल्ला सर केला.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते किल्ले सिंहगड व परिसरातील पर्यटनास चालना देणाऱ्या ‘माझा सिंहगड,माझा अभिमान’ हा उपक्रम आणि वन विभागाच्या वन्यजीव प्राणी सप्ताहाचे उद्घाटन झाले.
-
या अभियानाच्या अंतर्गत पर्यटनासाठी आवश्यक सुविधांचा विकास करण्यात येणार आहे.
-
किल्ले सिंहगड पुणे शहराच्या अगदी जवळ आहे.
-
सिंहगडावर पर्यटकांची वर्दळ असते. याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास कसा करता येऊ शकतो याबाबत गेली काही दिवसांपासून विविध पातळ्यांवर विचार विनिमय सुरु होता.
-
नुकताच वन विभागाचे अधिकारी, परिसरातील तज्ज्ञ, आणि मान्यवर व्यक्ती यांच्यासह सिंहगडाचा दौरा केला होता.
-
त्यानंतर या अभियानाची सुरुवात करण्याचे ठरविले होते. याअंतर्गत सिंहगडाचा इतिहास आणि इतर बाबींची पर्यटकांना अभ्यासपूर्ण व रोचक माहिती मिळावी यासाठी गाईड ट्रेनिंग सुरु करण्यात येत आहे.
-
याशिवाय नवे फुड स्टॉल्स देखील उभारण्यात येत असून त्याचे उद्घाटन अजित पवार यांनी केले.
-
सिंहगडावर वृक्षारोपणही करण्यात आले.
-
गडावरील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्यास अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
-
गडावर येणाऱ्या पर्यटकांना माहिती देण्यासाठी मराठी व हिंदी भाषा जाणणाऱ्या स्थानिकांना गाईड म्हणून वन विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येईल.
-
खासदार सुप्रिया सुळे पोलिस पोलीस कर्मचाऱ्यासोबत सेल्फी घेतला
-
सिंहगडावरील वातावरणाचा आंनद घेतांना खासदार सुप्रिया सुळे
-
खासदार सुप्रिया सुळे
-
यावेळी अजित पवार यांना विभागीय आयुक्त यांनी भेट दिली आणि सिंहगड किल्ल्यावर राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पांची पाहणी केली.
-
वन विभागाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या वन्यजीव सप्ताहाचा तसंच गाईड प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ देखील झाला.
-
किल्ले सिंहगड परिसराच्या पुरातन वारसाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरुप असा विकास करण्यात येईल. विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असं प्रतिपादन यावेळी अजित पवार यांनी केलं.
-
सिंहगडावर सेल्फी पॉईंट, गाईड ट्रेनिंग, प्लास्टिक बंदी, वन विभाग व पीएमपीएलच्या माध्यमातून ई व्हेइकल सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी आजित पवार यांनी दिली.
-
राज्यासह पुणे महानगरातून सिंहगडावर येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे गडालगत वाहनांची गर्दी होते.
-
यावेळी अजित पवार यांनी प्रस्तावित फूड स्टॉलची जागा,हवा पॉइंट, विश्रामगृह,वन विश्रामगृह येथे भेट देऊन पाहणी केली.
-
यावेळी खडकवासला आमदार भीमराव तापकीर,विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख,पुण्याचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, दिलीप बराटे, सचिन दोडके,सायली वांजळे, जि.प.सदस्या पूजा पारगे व नवनाथ पारगे, वन विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”