-
करीरोड येथील वन अविघ्न पार्क इमारतीच्या १९ व्या मजल्यावर शुक्रवारी लागलेल्या आगीत स्वत:चा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुरक्षा रक्षकाचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला.
-
गेल्या १० वर्षांमध्ये मुंबईत निरनिराळ्या ठिकाणी ४८,४३४ आगीच्या दुर्घटना घडल्या असून यापैकी १५६८ आगीच्या दुर्घटना गगनचुंबी इमारतींमध्ये घडल्या आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस बहुमजली इमारती असुरक्षित बनू लागल्या आहेत.
-
‘परिमंडळ-एक’च्या हद्दीत ९,८८७ आगीच्या दुर्घटना घडल्या असून यापैकी ३२५ दुर्घटना गगनचुंबी इमारत, एक हजार ५४६ दुर्घटना रहिवासी इमारतीत, ९८७ दुर्घटना व्यावसायिक इमारतीत आणि ७५ दुर्घटना झोपडपट्टीत घडल्या आहेत.
-
‘परिमंडळ-दोन’च्या हद्दीत सर्वाधिक १०,७१९ आगीच्या दुर्घटना घडल्या असून त्यापैकी १२९ गगनचुंबी इमारती, १,८२४ निवासी इमारती, ६६४ व्यावसायिक इमारती आणि ९३४ झोपडय़ांचा समावेश आहे.
-
‘परिमंडळ-तीन’च्या हद्दीत ८,७१७ आगीच्या घटना घडल्या असून त्यात ४९६ गगनचुंबी इमारती, १,३८२ रहिवासी इमारती, ९३९ व्यावसायिक इमारती आणि ४४३ झोपडय़ांचा समावेश आहे.
-
तसेच ‘परिमंडळ-चार’च्या हद्दीत एकूण ८,३२८, ‘परिमंडळ-पाच’च्या हद्दीत ५,६८३, तर ‘परिमंडळ-सहा’च्या हद्दीत एकूण ५,१०७ आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत.
-
‘परिमंडळ-तीन’मध्ये सर्वाधिक म्हणजे ४९६ गगनचुंबी इमारतींमध्ये आग लागली होती. तर ‘परिमंडळ-चार’च्या हद्दीतील १८३५ निवासी इमारतींना आगीची झळ बसली होती.
-
‘परिमंडळ-एक’मधील सर्वाधिक म्हणजे ९८७ व्यावसायिक इमारती, तर ‘परिमंडळ-पाच’मध्ये सर्वाधिक १२७३ झोपडय़ांना आग लागली होती.
-
दशकभरामध्ये म्हणजेच सन २००८ ते २०१८ दरम्यान मुंबईत आगीच्या एकूण ४८ हजार ४३४ घटना घडल्यात.
-
यापैकी गगनचुंबी इमारतींमध्ये १ हजार ५६८ वेळा आग लागलीय. तर निवासी इमारतींमध्ये आग लागण्याच्या घटना ८ हजार ७३७ वेळा घडल्यात.
-
याच कालावधीत मुंबई व्यावसायिक इमारतींना लागलेल्या आगीच्या घटनांची संख्या ३ हजार ८३३ इतकी आहे तर झोपडपट्ट्यांमध्ये आगी लागल्याच्या घटना ३ हजार १५१ वेळा घडल्यात.
-
सर्वाधिक वेळा म्हणजेच ३२ हजार ५१६ वेळा मुंबईत शॉर्टसर्किटमुळे आगी लागल्याच्या घटना घडल्यात.
-
त्या खालोखाल १ हजार ११६ वेळा गॅस सिलिंडरमधून गळती झाल्याने आगी लागल्यात. अन्य कारणांमुळे ११ हजार वेळा ८८९ आगी लागल्या आहेत.
-
२००८ ते २०१८ दरम्यान मुंबई लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये ६०९ जण मृत्यूमुखी पडलेत. या आगींमध्ये ८९ कोटी ४ लाख ८६ हजार १०२ रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झालं आहे.
-
माहितीचा अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत केलेल्या अर्जावर पालिकेकडून उपलब्ध झालेली माहिती. (सर्व फोटो फाइल फोटो आहेत, एएनआयवरुन साभार)

India beats Pakistan Video: पाकिस्तानी युवतीचा त्रागा; म्हणाली, “हरलात ते ठीक आहे, पण त्या कोहलीचं शतक…”!