-
छाप्याआधीच किरण गोसावी आणि समीर वानखेडेंसह एनसीबी अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी झाल्या. त्यानंतर ते क्रुझवर गेले : प्रभाकर साईल
-
२ ऑक्टोबर रोजी दुपारी क्रुझ गेटवर गोसावी यांनी मला काही फोटो पाठवून त्या लोकांना ओळखण्यास सांगितलं. त्या १०-१२ लोकांपैकी मी केवळ एका व्यक्तीला ओळखू शकलो : प्रभाकर साईल
-
काही वेळाने त्या व्यक्तीला पकडल्याचं त्यांनी मला सांगितलं. पाठवलेल्या फोटोंपैकी एक मुनमुन धमेचा होती : प्रभाकर साईल
-
ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला सोडून देण्यासाठी के. पी. गोसावीने सॅम नावाच्या मध्यस्थामार्फत अभिनेता शाहरुख खानकडे २५ कोटी रुपयांची मागणी केली : प्रभाकर साईल
-
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितल्यानंतर मी पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केली : प्रभाकर साईल
-
आर्यनला रात्री १२ वाजताच्या सुमारास एनसीबी कार्यालयात आणलं. त्यानंतर पंचाच्या सह्या करण्यासाठी गोसावीने मला एनसीबी कार्यालयात बोलावलं. साळेकर नावाच्या एनसीबी अधिकाऱ्यांनी मला कोऱ्या कागदावर सह्या करायला सांगितल्या. मी नकार दिला असता समीर वानखेडेंनी काहीच होणार नाही, तू सही कर असं म्हटलं. तेव्हा मी जवळपास १० कोऱ्या कागदावर सह्या केल्या : प्रभाकर साईल
-
एनसीबी कार्यालयात किरण गोसावीने आर्यन खानला फोनवरून कुणाशी तरी बोलणं करून दिलं. यानंतर काही वेळाने सॅम नावाचा व्यक्ती आला : प्रभाकर साईल
-
सॅम आणि गोसावी यांच्यामध्ये दोन मिटिंग झाल्या. त्यांनी सॅमला फोन करून २५ कोटींची डील करण्यास सांगितलं. माझ्या माहितीनुसार तो शाहरुख खानच्या मॅनेजरसोबत बोलत होता. त्यानंतर एका ठिकाणी पूजा ददलानी, सॅम आणि किरण गोसावी यांची १५ मिनिटं भेट झाली : प्रभाकर साईल
-
किरणने मला ५० लाख रुपये आणायला जायला सांगितलं. इंडियाना हॉटेलजवळ गाडीतल्या दोघांनी पिशव्या दिल्या, त्यात पैसे होते. ते पैसे घेऊन मी सांगितल्याप्रमाणे वाशीला परत गेलो : प्रभाकर साईल
-
दुसऱ्या दिवशी गोसावीने फोन करून बोलावलं आणि पैशाची पिशवी सॅमला दिली : प्रभाकर साईल

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”