-
केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या विक्रीच्या म्हणजेच Sovereign Gold Bond Scheme च्या आगामी चार टप्प्यांची घोषणा केली असून, या रोख्यांमध्ये गुंतवणुकीचा सातवा टप्पा सोमवारपासून (२५ ऑक्टोबर) सुरू झाला आहे.
-
गुंतवणूकदारांना २९ ऑक्टोबपर्यंत अर्ज करता येणार आहे. दिवाळीच्या तोंडावर धनत्रयोदशीला (२ नोव्हेंबर) हे रोखे गुंतवणूकदारांना जारी करण्यात येतील.
-
भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक अत्युच्च टप्प्यावर अनिश्चितता दर्शवित असताना, सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून आणि दिवाळीत होणारी पारंपरिक खरेदी पाहता गुंतवणूकदारांचा सुवर्ण रोख्यांकडे ओढा राहण्याची शक्यता आहे.
-
यंदाच्या टप्प्यात सुवर्ण रोख्यांच्या प्रत्येक ग्रॅम सोन्याची किंमत ४,७६५ इतकी निश्चित करण्यात आली आहे.
-
शिवाय जे गुंतवणूकदार ‘डिजिटल’ माध्यमातून खरेदी रक्कम भरतील, त्यांना रोख्याच्या खरेदीवर प्रतिग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळणार आहे. म्हणजेच त्यांना ४,७१५ रुपये प्रतिग्रॅमप्रमाणे सोने मिळविता येणार आहे.
-
सरकारच्या वतीने रिझव्र्ह बँकेकडून ही रोखे विक्री व्यवस्थापित केली जाते आणि सामान्य ग्राहकांना यासाठी निर्धारित बँकांच्या इंटरनेट बँकिंग अथवा प्रत्यक्ष शाखेतून आणि टपाल कार्यालयातून हे रोखे खरेदी करता येतील.
-
केंद्र सरकारची हमी असणारे या सुवर्ण रोख्यांमध्ये व्यक्ती आणि अविभक्त हिंदू कुटुंबांना (एचयूएफ) किमान १ ग्रॅम ते कमाल चार हजार ग्रॅम सुवर्ण रोखे एका आर्थिक वर्षांत खरेदी करता येतील.
-
तर ट्रस्ट व तत्सम संस्थांसाठी वीस हजार ग्रॅम वजनाचे सुवर्ण रोखे एका आर्थिक वर्षांत खरेदी करता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
-
चालू वर्षांत सुवर्ण रोखे विक्रीचा आठवा टप्पा २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर, नववा टप्पा १० ते १४ जानेवारी २०२२ दरम्यान असेल.
-
विक्रीचा दहावा टप्पा २८ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२२ दरम्यान विक्रीस खुला होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजनाद्वारे पुढेही गुंतवणूक करता येऊ शकेल.
-
सुवर्ण रोख्यांच्या प्रत्येक ग्रॅम सोन्याची किंमत ४,७६५ इतकी निश्चित करण्यात आली आहे. शिवाय जे गुंतवणूकदार ‘डिजिटल’ माध्यमातून खरेदी रक्कम भरतील, त्यांना रोख्याच्या खरेदीवर प्रतिग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळणार आहे.
-
म्हणजेच त्यांना ४,७१५ रुपये प्रतिग्रॅमप्रमाणे सोने मिळविता येणार आहे. शिवाय रिझव्र्ह बँकेद्वारे वितरीत व सरकारची हमी असलेल्या या ८ वर्षे मुदतीच्या रोख्यांवर दरसाल २.५ टक्के व्याज लाभही गुंतवणूकदारांना मिळेल. (सर्व फोटो प्रातिनिधिक सौजन्य रॉयटर्स आणि फायनॅनशिअल एक्सप्रेसवरुन साभार)

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?