-
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आज अर्थात शुक्रवारी त्याची तुरुंगातून सुटका होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
-
मात्र, आर्यन खानच्या सुटकेमध्ये अजूनही बरेच सोपस्कार पार पडणं आवश्यक आहे. त्यामुळेच ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनीही आर्यनची सुटका शुक्रवारी किंवा शनिवारी होण्याची शक्यता वर्तवली होती.
-
मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी संध्याकाळी आर्यन खानला जामीन मंजूर केला. मात्र, न्यायालयाच्या निकालाची ऑर्डर गुरुवारी संध्याकाळी मिळू शकली नाही. ती आज मिळू शकेल.
-
ही ऑर्डर घेण्यासाठी न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या दालनाच्या बाहेरच आर्यन खानच्या प्रकरणाचं काम करणाऱअया वकील आनंदिनी फर्नांडिस यांना लीगल टीमनं थांबण्याची जबाबदारी सोपवल्याचं सांगितलं जात आहे.
-
ही ऑर्डर मिळाल्यानंतर आर्यन खानच्या लीगल टीमला पुन्हा एकदा एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात जावं लागेल. कारण आर्यन खानची कस्टडी सध्या विशेष न्यायालयाकडे आहे.
-
जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने काही रक्कम जातमुचलक्यावर जमा करण्याचे आदेश दिल्यास ती रक्कम विशेष न्यायालयात जमा करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आर्यन खानच्या सुटकेचे आदेश विशेष न्यायालयाकडून निघतील.
-
हा आदेश मिळाल्यानंतर संध्याकाळी साडेपाचच्या आत लीगल टीमला त्या आदेशाची प्रत आर्थर रोड तुरुंगाबाहेरच्या बॉक्समध्ये टाकावी लागेल.
-
दररोज सकाळी ८ आणि संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास असे दिवसातून दोनदाच हे बॉक्स उघडले जातात. त्यामुळे आर्यन खानच्या सुटकेचे आदेश संध्याकाळी साडेपाचपूर्वीच या बॉक्समध्ये पडायला हवेत.
-
जर या कोणत्याही टप्प्यावर उशीर झाला आणि पेपर बॉक्समध्ये पडण्यास साडेपाचची वेळ उलटून गेली, तर मात्र आर्यन खानला आजही तुरुंगातच राहावं लागू शकतं.
-
सर्व कागदपत्रांची पूर्तता वेळीच झाली, तर आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा हे तिघे आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तुरुंगातून बाहेर येऊ शकतात.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”