-
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहीत पवार कुटुंबावर भ्रष्टाचारचे गंभीर आरोप केले आहेत.
-
मी दिवाळीनंतर बोलणार होता, पण पवार साहेबांना घाई झालीय, असं यावेळी सोमय्या यांनी म्हटलं आहे.
-
यावेळी सोमय्या यांनी पवारांबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्ताधारी महाविकास आघाडीवरही निशाणा साधलाय.
-
आपण तीन जावयांचा घोटाळा समोर आणणार असं म्हणालो होतो त्याप्रमाणे आज आपण पवारांचे जावाई मोहन पाटील यांच्या मार्फत झालेल्या व्यवहारांवर बोलणार असल्याचं सांगत सोमय्या यांनी हे आरोप केलेत.
-
जरंडेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी आलेत. हे पैसे बिल्डरांनी दिले आहेत. हे सर्व सर्व त्यांनी कुटुंबियांच्या खात्यात वळवल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय.
-
ए.ए.पवार यांच्याबरोबरच अजित पवार यांनी स्वत:च्या आईच्या खात्यातही हे पैसे वळवल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केलाय.
-
मोहन पाटील, वियजा पाटील, सुनेत्रा पवार यांचे सगळे काळेकारभार तिकडनंच होतात, असंही सोमय्या म्हणालेत.
-
पवारांनी हे नवाब मलिकांना आता पुढे करत असल्याचंही सोमय्या म्हणाले आहेत.
-
वानखेडेंच्या पहिल्या लग्नाच्यावेळी ते का गप्प बसले?, सेवेत आले तेव्हा का गप्प बसले?, असा प्रश्न सोमय्या यांनी मलिक यांना विचारला आहे.
-
पवार परिवारानं महाराष्ट्राला खूप लुटलंय, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.
-
नवाब मलिक रोज उठून दाऊद दाऊद करतात कारण हे नाव त्यांना अत्यंत जवळचं आहे, असा टोलाही सोमय्या यांनी लगावलाय.
-
हे (फडणवीसांवर आरोप करण्याचं) घाणेरडं राजकारण केवळ उद्धव ठाकरे, शरद पवारच करू शकतात, नवाब मलिकांची तेवढी कुवत नाही, असं सोमय्या म्हणालेत.
-
अखेर अनिल देशमुख यांना इडीच्या कस्टडीत जावं लागणार आहे असंही सोमय्या म्हणाले आहेत.
-
अखेर अनिल देशमुख यांना इडीच्या कस्टडीत जावं लागणार ते आले स्वतःच्या गाडीने परंतु जाणार इडीच्या कस्टडीत असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.
-
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे हे पैसे कसे वळवले जात होते हे अनिल देशमुख यांना सांगावं लागणार असल्याचं वक्तव्य सोमय्या यांनी केलं आहे.
IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?