-
देवेंद्र फडणवीस यांचा निरीज गुंडे हा वजीर याच शहरात राहतो. फडणवीस सरकारच्या काळात त्याला मुख्यमंत्री निवास, मुख्यमंत्री कार्यालयात, सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश होता. सर्व पोलिसांच्या बदल्या तो ठरवत होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील तोच ठरवायचा. महाराष्ट्रात त्याच्याच माध्यमातून वसुली केली जायची : नवाब मलिक
-
देवेंद्र फडणवीस नवी मुंबई किंवा पुण्याला जायचे तेव्हा सायंकाळी त्यांच्या घरी हजेरी लागायचे. फडणवीस सातत्याने नीरज गुंडेच्या घरी बसायचे. तिथूनच देवेंद्र फडणवीसांचं मायाजाल चालायचं : नवाब मलिक
-
सरकार बदलल्यानंतर महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, आयकर किंवा एनसीबी अशा सर्व केंद्रीय तपास संस्थांच्या कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांचा वाझे फिरताना दिसत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कोट्यावधी रुपये वसूल केले जात आहेत : नवाब मलिक
-
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू होता. फडणवीस मुंबईतील ड्रग्ज रॅकेटला संरक्षण देत होते. त्यामुळे केंद्र सरकारने एक चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा तपास करायला लावावा : नवाब मलिक
-
नीरज गुंडे ड्रग्ज व्यवसायिक असून तो फडणवीस सरकारच्या काळात भाजप-शिवसेनेत वाद झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दूत बनून उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचा : नवाब मलिक
-
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असतानाही गुंडे भाजपा आणि शिवसेना सोबत यावी यासाठी प्रयत्न करत होता : नवाब मलिक
-
समीन वानखेडे मागील १४ वर्षांपासून मुंबईत वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करत आहेत. त्यांच्या बदल्या करण्यात महाराषट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत : नवाब मलिक
-
प्रसिद्धी मिळवत लोकांना फसवण्यासाठी आणि ड्रग्जचा खेळ मुंबई आणि गोव्यात सुरू राहावा यासाठीच समीर वानखेडेंना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं : नवाब मलिक
-
ज्या व्यक्तीने बनावट प्रमाणपत्र बनवून एका मागासवर्गीयाचे अधिकार हिरावून घेतले. त्यांनी मला धमकी दिलीय. जास्त बोललात तर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन तुरुंगात टाकू : नवाब मलिक
-
काशिफ खान सारखे मोठमोठ्या ड्रग पेडलरला सोडून देण्यात येतं. ऋषभ सचदेवा, आमीर फर्नीचरवाला, प्रतिक गाबा यांना सोडून देण्यात येतं. महाराष्ट्रातील सर्व ड्रग्जचा खेळ देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालतो : नवाब मलिक
-
प्रतिक गाबा मुंबईत कोणत्या हॉटेल्समध्ये पार्टी आयोजित करतो, एका टेबलची किंमत ५,१०,१५ लाख रुपये कशी असते? त्याला एनसीबीने पकडले असताना सोडून का दिले? या खेळात प्रतिक गाबा सर्वात मोठ्या भूमिकेत आहे. आगामी काळात आम्ही त्याच्या विषयीची माहिती माध्यमांसमोर ठेऊ : नवाब मलिक
-
पुरुषोत्तम सोलंकी यांचे छोट्या शकील आणि दाऊदशी संबंध होते. सोलंकीवर १९९२ मध्ये आमचं सरकार असताना कारवाई करण्यात आली होती. हेच सोलंकी नंतर गुजरातच्या भावनगरला राहायला गेले. त्यांना मोदी सरकारच्या काळात १० वर्ष मंत्रीपद देण्यात आलं. किरीट सोमय्या तुम्ही मोदींना विचारा की हा दाऊदशी संलग्न माणूस तुमच्या मंत्रिमंडळात कसा होता : नवाब मलिक

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”