-
दीपोत्सवानिमित्त बुधवारी अयोध्येत विशेष रोषणाई करण्यात आलेली.
-
शरयू नदीच्या तीर लाखो पणत्यांनी उजळून निघाल्याचं यावेळी पहायला मिळालं.
-
एक दोन नव्हते तब्बल नऊ लाख पणत्या यावेळी लावण्यात आलेल्या.
-
पणत्यांबरोबरच विशेष विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली होती.
-
विद्युत रोषणाईच्या सहाय्याने अशाप्रकारे वेगवेगळी दृष्य शरयू नदी काठच्या इमारतींवर साकारण्यात आलेली.
-
हा दीपोत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झालेली.
-
हा अयोध्येमधील पाचवा दीपोत्सव ठरला.
-
योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्री झाल्यापासून हा दीपोत्सव साजरा केला जात आहे.
-
विशेष लेझर शोचेही यावेळी आयोजन करण्यात आलेलं.
-
विद्यृत रोषणाईमधून साकारलेले प्रभू रामचंद्र
-
विद्यृत रोषणाईमधून अनेक धार्मिक प्रतिकृती थेट इमारतींवर साकारण्यात आलेल्या.
-
प्रभू रामचंद्रांबरोबरच भगवान श्रीकृष्णाची प्रतिमाही विद्यृत रोषणाईच्या माध्यमातून पहायला मिळाल्या
-
हे दृष्य फारच मनमोहक आणि सुंदर दिसत होते.
-
लाखो दिव्यांनी नदी काठ उजळून गेलेला.
-
यंदा या दीपोत्सवाने जागतिक स्तरावरील विक्रमही प्रस्थापित केला.
-
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारीही या सोहळ्याला उपस्थित होते.
-
या अधिकाऱ्यांच्या हस्ते या सोहळ्याची दखल थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतल्याचं प्रमाण पत्र मुख्यमंत्र्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आलं.
-
एकाचवेळी तेलाचे सर्वाधिक दिवे लावण्याचा विक्रम या दीपोत्सवाच्या माध्यमातून नोंदवण्यात आला. (सर्व फोटो ट्विटरवरुन साभार)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?