-
दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी सीमेवर तैनात जवानांच्या भेटीसाठी, दिवाळी साजरी करण्यासाठी नौशेरा सेक्टरच्या दौऱ्यावर आहेत.
-
नौशेरामध्ये त्यांनी तैनात असलेल्या जवानांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.
-
पंतप्रधानांनी स्वत:च्या हाताने भारतीय लष्करातील जवानांना मिठाई खाऊ घातली.
-
यावेळी बोलताना आपण नौशेरामध्ये पंतप्रधान म्हणून आलेलो नसून इथल्या जवानांच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून आलो असल्याचं मोदी म्हणाले.
-
नौशेरामध्ये दाखल झाल्यानंतर मोदींनी आधी सीमेचं रक्षण करताना शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
-
येथील अमर ज्योतीजवळ पुष्कचक्र मोदींनी अर्पण केलं.
-
शहीदांना अभिवादन करताना मोदींनी सॅल्यूट केल्याचंही पहायला मिळालं.
-
त्यानंतर मोदींनी काही निवृत्त सैनिकांची भेट घेतली.
-
मोदींच्या या दौऱ्याचे फोटो पीआयबी आणि एनएनआयकडून पोस्ट करण्यात आले आहेत.
-
शहीदांना अभिवादन करताना मोदींनी सॅल्यूट केल्याचंही पहायला मिळालं.
-
यावेळी मोदींनी नैशेरामधील सर्व परिस्थिती आढावाही घेतला.
-
मी एकटा नाही आलोय. मी माझ्यासोबत १३० कोटी देशवासीयांचे आशीर्वाद तुमच्यासाठी आणले आहेत, असंही मोदी म्हणाले.
-
आज संध्याकाळी भारताचा प्रत्येक नागरीक दिवाळीनिमित्ताने एक दिवा लावून तुमच्या वीरत्वासाठी, तुमच्या शौर्यासाठी, तुमच्या पराक्रमासाठी लावून तुम्हाला नक्कीच शुभेच्छा देतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
-
यावेळी मोदींनी काही निवृत्त सैनिकांशीही चर्चा केली. या भागातील सुरक्षा हा या चर्चेचा विषय होता.
-
मोदींच्या हस्ते या निवृत्त जवानांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…