-
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्याचं दिसत आहे.
-
आतापर्यंत महाराष्ट्रातील एसटीच्या २५० आगारांपैकी २२३ आगार बंद झालेत.
-
ठाणे जिल्ह्यातील सर्व आगार बंद आहेत.
-
राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळते आहे.
-
यामुळे ऐन सणासुदीत प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत.
-
आधीच करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू निर्बंधांमुळे ग्रामीण भागातील बससेवा बंद होत्या.
-
आता संपानंतर लॉकडाऊन पश्चात सुरू झालेली शहरी बससेवा देखील ठप्प झालीय.
-
अशा स्थितीत नागरिकांना प्रवास करताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
-
एसटी बससेवा ठप्प झाल्यानं याचा फायदा खासगी वाहतुकीला झालाय. मात्र, तेथे प्रवाशांची लूट होतानाही दिसत आहे.
-
त्यामुळे आता सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीवर काय पाऊल उलचलं यावरच हा संप मिटणार की आणखी चिघळणार हे ठरणार आहे.
-
दुसरीकडे हे प्रकरण न्यायालयातही गेलंय. त्यामुळे न्यायालयाच्या भूमिकेवरही या संपाचं भविष्य अवलंबून राहणार आहे.

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा