-
कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.
-
कार्तिकी एकादशी निमित्त पुण्यातील भाविक राम जांभूळकर यांनी फुलांची आरस केली.
-
या वेळी झेंडू, शेवंती, गुलाब, ऑरकेट अशा विविध फुले आणि पानाची आकर्षक आरास करण्यात आली. या फुलांच्या आरस मुले देवाचे रूप अधिकच खुलून दिसून आले.
-
“राज्यावर कृपादृष्टी कायम ठेवून राज्याची भरभराट करावी व राज्यातील शेतकरी व कष्टकरी यांना यश द्यावे. राज्यातील प्रत्येकाच्या घरात धनधान्य, सुख-शांती व समृद्धी नांदावी. राज्य, देश आणि जगातील करोनाचे संकट कायमचे दूर व्हावे, तसेच सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याची महाराष्ट्राची परंपरा कायम रहावी,” असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घातले.
-
विठ्ठलाच्या आशीर्वादाने राज्यावर आलेले करोनाचे संकट कमी होत असून येणाऱ्या काळात संपूर्ण जगातून करोना नाहीसा होवो हीच विठ्ठला चरणी प्रार्थना आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीने मंदिर विकासाच्या आराखड्यासह विविध मागण्या केलेल्या आहेत. त्याबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
-
या वर्षीच्या कार्तिकी वारीस एसटी संपामुळे वारकऱ्यांची संख्या कमी आहे असे नमूद करून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर राज्य शासनाकडून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
-
त्रिपुरा येथील घटनेमुळे राज्यातील मालेगाव, नांदेड व अमरावती येथे काही घटना घडल्या. अशा प्रकारांमुळे पोलिसांवर ताण पडतो. राज्यातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये. जातीय सलोखा राखण्याची आपल्या राज्याची परंपरा असून ही परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन पवार यांनी केले.
-
या वेळी मानाचा वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील सोनखेड तालुक्यातील कोंडीबा टोणगे, प्रयागबाई कोंडीबा टोणगे यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला.
-
या दाम्पत्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
-
त्यानंतर त्यांना राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने देण्यात येणारा प्रवास सवलत पास पवार यांनी सुपूर्द केला.
-
शासकीय महापूजा संपल्यानंतर तात्काळ विठ्ठल दर्शनास सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनया कुलकर्णी यांनी केले.
-
यावेळी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव आदी उपस्थित होते.
-
गेली दीड वर्षे म्हणजे सहा वारीवर निर्बंध होते. मात्र सरकारने परवानगी दिल्याने पंढरी नगरी पुन्हा केंदा दुमदुमून निघाली आहे.
-
एकादशी निमित्त जवळपास २ लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहे.
-
देवाचे दर्शन चंद्रभागा नदीचे स्नान आणि नगरप्रदक्षिणा केली जाते. त्यामुळे वारकर्यांची लगबग सुरु आहे.
-
प्रशासनाने विविध ठिकाणी वैद्यकीय पथकं, ५ ठिकाणी लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहे.
-
असे असले तरी टाळ मृदुंगाचा जयघोष आणि हरी-नामाच्या गजराने पंढरी पुन्हा दुमदुमून गेलीय.
-
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पवार दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.
-
यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, सारिका भरणे, मानाचे वारकरी कोंडीबा देवराव टोणगे, प्रयोगबाई कोंडीबा टोणगे, आ. समाधान आवताडे, नगराध्यक्षा साधना भोसले आदी उपस्थित होते.
-
पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदीर

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”